esakal | चिंताजणक : रत्नागिरीत कोरोनाच्या मृत्यू दारात होतेय वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

corona deaths are on the rise In Ratnagiri

जिल्ह्यात सध्या 201 अ‍ॅक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत. संस्थात्मक विलगीकरणात कक्षामध्ये एकूण 157 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

चिंताजणक : रत्नागिरीत कोरोनाच्या मृत्यू दारात होतेय वाढ 

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसभरात 96 नवे रुग्ण सापडले असून रुग्णांची संख्या 2,487 वर पोचली आहे. तसेच दिवसभरात चौंघांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 86 वर गेली असून मृत्यूदर 3.49 टक्के झाला आहे. तर दिवसभरात 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 616  झाली आहे. 

रत्नागिरी तालुक्यासह काही तालुके हॉट स्पॉट ठरत आहेत. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिचे काचेकोर पालण करण्याची गरज आहे. 
गेल्या 24 तासात जिल्ह्यात पुन्हा 95 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. यामध्ये रत्नागिरी 25, दापोली 13, कामथे 21, गुहागर  26, देवरुख  5, लांजा  1, खाजगी प्रयोगशाळा 5 (चिपळूण - 1, खेड- 4) यांचा समावेश आहे. तर जिल्ह्यातील चौघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील 53 वर्षीय महिला रुग्ण, शिवाजीनगर, रत्नागिरी येथील 68 वर्षीय महिला रुग्णांचा तसेच  पुर्णगड, रत्नागिरी येथील  61 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. खेर्डी (चिपळूण) येथील 86 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 87 झाली आहे. मृत्यूचे प्रमाण 3.49 टक्के झाले आहे. 

जिल्ह्यात सध्या 201 अ‍ॅक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन आहेत. संस्थात्मक विलगीकरणात कक्षामध्ये एकूण 157 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांऱ्यांची संख्या 49 हजार 117  इतकी आहे. परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात 2 लाख 75 हजार 764 व्यक्ती दाखल झाल्या. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 17 हजार 972 आहे.

 कोरोना बाधित आढळलेल्यांमधील रत्नागिरी तालुक्यातील संभाजीनगर-नाचणे, नवलाईनगर-नाचणे, लक्ष्मी नारायणवाडी, कासारवेली, जांभुळ फाटा-मिरजोळे, भाटये मोहल्ला, नागलेवाडी, आंबेशेत, कुवारबाव, बौध्दवाडी-पोमेंडी बु, निवळी तिठा, करबुडे, मुळगांव, शंखेश्वर मधुबन-माळनाका, शासकीय कर्मचारी वसाहत (आरोग्य मंदीर) रत्नागिरी, थिबा पॅलेस रोड, कोकणनगर, तेली आळी, अदमापूर, गोळप, कारंवाचीवाडी, शांतीनगर, जयगड, सडेवाडी, विनम्रनगर-नाचणे, शिवाजीनगर, गाडीतळ, गोळप मोहल्ला, टिळकआळी आदी क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

हे पण वाचाअरेच्च्या ! दोन रुपयांत थिएटरला सिनेमा

 जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गणेशोत्सवात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले, क्वारंटाईनचे नियम व्यवस्थित पाळून उत्सव साजरा करा. सामुहीक आरती, भजन करू नये. लक्षणे आढळल्यास तात्काळ अ‍ॅन्टीजेझेन टेस्ट करून घ्या. गणेशोत्सवानंतर लॉकडाऊन करण्याची वेळ येऊन ये, यासाठी शासनाचे नियम पाळा आणि कोरोनाची लागण टाळा. रशियाने कोरोनाची लस तयार केली आहे. भारतामध्येही अशी लस बनविली जात आहे. ती वापरात येईपर्यंत संयम बाळगा.

संपादन - धनाजी सुर्वे
 

loading image