
राजापूर - कोरोनोच्या संकटामध्ये लॉकडाऊनमुळे मोठ्या संख्येने चाकरमानी गावाला अडकून पडले आहेत. सर्वसामान्यांची उपासमार होवू नये म्हणून शासनातर्फे त्यांना रेशनिंग दुकानांच्या माध्यमातून मोफत धान्य वितरणने केले जात आहे. मात्र चाकरमान्यांना धान्य वितरणाबाबत शासनाने कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे नोकरीअभावी आर्थिक कोंडीत सापडलेल्या चाकरमान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
राजापूर तालुक्यामध्ये वीस हजारहून अधिक मुंबईकर चाकरमानी लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. दीड महिना ते गावात आहेत. त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. या चाकरमान्यांना रेशनिंग धान्य पुरवठा आणि तत्सम जीवनावश्यक वस्तू आणि सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित यशवंतराव यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
हे पण वाचा - रनपार मधील 13 जण क्वारंटाईन...
गावामध्ये त्यांचे रेशनिंग कार्ड नसल्याने या चाकरमन्यांना बाजारातून रोखीतून धान्य खरेदी करून गुजराण करावी लागत आहे. गावामध्ये अडकल्याने हातात पैसा नाही. वैद्यकीय खर्चासह दैनंदिन जेवणासाठी लागणार्या धान्याच्या खर्चाचा भार उचलताना चाकरमान्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सर्वसामान्यांची उपासमार होवू नये म्हणून शासनाने रेशनिंग धान्य दुकानांच्या माध्यमातून मोफत धान्य पुरवठा केला जात आहे. याचा लाभ स्थानिक पातळीवरील रेशनिंग कार्डधारकांना होवून त्यांना धान्य उपलब्ध झाले आहे. मात्र चाकरमान्यांना रेशनिंग धान्य उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.
गावातील लोकांच्या धान्यात चाकरमान्यांना हिस्सा
स्थानिक पातळीवर रेशनिंग धान्य दुकानांद्वारे प्रतीमाणसी धान्य वितरण सुरू आहे. त्यामध्ये चाकरमान्यांचा समावेश नाही. त्यामुळे गावच्या लोकांना रेशनिंग धान्य दुकानांवरून मिळणार्या धान्यामध्ये मुंबईकर चाकरमान्यांना सामावून घ्यावे लागत आहे. त्याच्यावर चाकरमान्यांना गुजराण करावी लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.