
जिल्ह्यात आज आणखी एका कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आज आणखी एका कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देवगड तालुक्यातील शिरगांव येथील 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. सदर महिलेस मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता. पनवेल येथून आलेल्या या महिलेचा दिनांक 28 मे रोजी स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याचा अहवाल दिनांक 2 जून रोजी प्राप्त झाला होता.
हेही वाचा- सावधान : सावंतवाडी तालुक्यात वाढतोय कोरोनाचा आलेख... -
दिवसभरात आणखी दोघांना कोरोनाची बाधा
कोरोना तपासणीचे आज प्राप्त झालेल्या अहवालांनुसार आणखी 2 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे आणि चौकुळ या गावातील हे दोन रुग्ण आहेत. तर काल जिल्ह्यातील रुग्णसंख्येमध्ये 6 ची भर पडली आहे. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील 3, सावंतवाडी तालुक्यातील 1, वैभववाडी तालुक्यातील 1, देवगड तालुकयातील एका व्यक्तीचा समावेश आहे.