ह्रदयद्रावक ; जन्म घेताच गाठले कोरोनाने; मातेलाही झाली लागण 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

प्रसूतीनंतर आई आणि जन्मजात बालकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर आता 20 ते 35 च्या टप्प्याने पडू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी एकदम 35 रुग्ण सापडल्यानंतर आज नवीन 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे जन्मजात बाळालाही कोरोनाची लागण झाली. 

याबाबत अधिक माहिती अशी, शासकीय रुग्णालयामध्ये प्रसुतीसाठी दोन महिला दाखल झाल्या होत्या. त्यापैकी एका महिलेची प्रसूती झाली. परंतु, प्रसूतीनंतर आई आणि जन्मजात बालकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. शासकीय रुग्णालयात असलेल्या प्रसूती गृहातील एकूण दोन महिलांना कोरोनाची झाली आहे. मात्र, नुकत्याच जन्म झालेल्या बाळाला कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दोन्ही माय लेकरांवर कोरोनाचा उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आता 580 वर पोचलीआहे.  रत्नागिरी जिल्ह्यावरील कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या 20 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शिरगाव (ता. रत्नागिरी)-03, जेल रोड (ता. रत्नागिरी)-02, मालगुंड (ता. रत्नागिरी) -01, गावडे आंबेरे (ता. रत्नागिरी)-01, राजिवडा (ता. रत्नागिरी)-01, घरडा कॉलनी लवेल (ता. खेड)-06,  कुंभारवाडा (ता. खेड)-01, पायरवाडी कापसाळ (ता.चिपळूण)-02, पेठमाप चिपळूण-01, गोवळकोट (ता.चिपळूण)-01, जुनी कोळकेवाडी (ता.चिपळूण)-01, या रुग्णांचा समावेश आहे. यापूर्वी जिल्ह्यामध्ये  कमी प्रमाणात रुग्ण सापडत होते. मात्र त्याची संख्या आता वाढू लागली आहे. विशेष करून रत्नागिरी तालुक्याला कोरोनाने चारीबाजूने घेरल्याचे आकडेवरीवरून स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता शिरकाव चिंतेची बाब आहे.

हे पण वाचा - ...अन् पोलिसांच्या सर्कतेमुळे वाचला त्या युवकाचा जीव

 

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -580

बरे झालेले रुग्ण -430

मृत्यू-25

 अ‍ॅक्टिव्ह -125+1


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona infection for newborn baby in ratnagiri