रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव 

राजेश शेळके 
Tuesday, 29 September 2020

जिल्ह्यात संसर्ग आटोक्यात आला असला तरी तो वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा रेषो पुन्हा वाढताना दिसत आहे. गेल्या चोविस तासात 64 बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 7 हजार 331 झाली. यात रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्यातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात प्रवेश केला आहे. गेल्या दोन दिवसात पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 261 झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे पुन्हा मृत्यूदर 3.56 वर पोचला आहे.

जिल्ह्यात संसर्ग आटोक्यात आला असला तरी तो वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेंतर्गत तपासणी आतापर्यंत सुमार पन्नास टक्के लोकांची तपासणी झाली आहे. त्या तुलनेत रुग्णांची संख्या तशी टप्प्यात आहे. परंतु ती वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने मास्क सक्तीचे केले आहेत. आज सापडलेल्या एकुण 64 रुग्णांमध्ये आरटीपीसीआरमधील 10 अहवाल तर अ‍ॅन्टीजेनमध्ये 54 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मंडणगड, दापोली, गुहागर, लांजा, राजापूर या पाच तालुक्यात एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही. उर्वरित खेड 2, चिपळूण 11, संगमेश्‍वर 16, रत्नागिरी 35 रुग्ण  नव्याने सापडले आहेत. जिल्ह्याचा वाढता मृत्यूदर चिंतेची बाब बनली आहे. साडेतीन टक्क्याच्या वर मृत्यूदर गेला आहे. आज 1 रुग्ण तर काल 4 रुग्ण असे एकूण 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील 70 आणि 58 वर्षाच्या पुरूषांचा समावेश आहे. तर चिपळूण येथे 47, लांज्याला 55 वर्षाच्या पुरूषाचा तर गुहागरला 80 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण 261 बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात 719 रुग्ण उपचाराखाली आहेत. 

हे पण वाचादापोलीत लवकरच साकार होणार शिवरायांचा अश्वारूढ पुतळा

  दुप्पट रुग्ण बरे

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक आहे. आज दीडशे रुग्णांनी एका दिवसात कोरोनावर मात केली आहे. नवीन दाखल होण्याच्या तुलनेत दुप्पट रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे 84.79 टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे.

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  -- 7,331
 बरे झालेले रुग्ण - 6,216
  एकून निगेटिव्ह - 36,347
  एकूण मृत्यू - 261
 उपचाराखालील रुग्ण - 719

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infiltrates Ratnagiri District Collectors Office