रत्नागिरीत गर्दीचा परिणाम; मार्चमध्ये 1 हजार 55 जण कोरोनाबाधित

corona patients in ratnagiri in march increased found 1000 effects mob of people
corona patients in ratnagiri in march increased found 1000 effects mob of people
Updated on

रत्नागिरी : कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण महाराष्ट्रात असून, त्याचा प्रभाव रत्नागिरी जिल्ह्यातही सुरू आहे. मार्च महिन्यात 1 हजार 55 कोरोनाबाधित आढळून आले. गतवर्षी ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सण, उत्सवांसह विविध सोहळे साजरे करण्यासाठी गर्दी झाल्यामुळेच मार्चमधील रुग्णसंख्या वाढल्याचा अंदाज आरोग्य यंत्रणेने वर्तविला आहे. 

फेब्रुवारी महिन्याअखेरपर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित सापडलेल्यांची संख्या 9 हजार 991 पर्यंत पोचली होती. सप्टेंबर 2020 नंतर संपूर्ण देशभरातच कोरोनाची पहिली लाट ओसरू लागली. त्याचा परिणाम कोकणातील जिल्ह्यातही दिसू लागला. रत्नागिरी जिल्ह्यात रुग्ण सापडण्याचे प्रमाणही पुढे अत्यल्प होते. फेब्रुवारी महिन्याअखेरीस दुसऱ्या लाटेची शक्‍यता निर्माण झाली होती. त्या दृष्टीने राज्यशासनाकडून जनतेला कोरोना निकष पाळण्याचे आवाहन करण्यास सुरवात झाली होती. या काळात फेब्रुवारी महिन्यात सापडलेल्या रुग्णांचा आकडा कमी होता; परंतु मार्च महिन्यात कोरोना रुग्ण सापडण्याची संख्या वाढू लागली. 1 मार्चला 17 रुग्ण संख्या होती. 

पहिल्या आठ दिवसांत 144, दुसऱ्या आठ दिवसांत 134, तिसऱ्या आठ दिवसांत 239 तर चौथ्या आठ दिवसांमध्ये 538 कोरोनाबाधित आढळून आले. मार्चच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. याच कालावधीत उत्सवाचे ढोल वाजू लागले होते. तसेच विवाहसोहळ्यांसह एकत्र येण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्यामधून कोरोना समूह संसर्ग झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत. उत्सव साजरे करण्यासाठी एकत्रित आल्यामुळे एकमेकांशी वाढलेला संपर्क हे महत्त्वाचे कारण मानले जात आहे. हे प्रमाण ग्रामीण भागात सर्वाधिक आहे. पूर्वी शहरी भागांमध्ये रुग्ण आढळत होते. मार्च महिन्यापर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 11 हजार 29 होती. एप्रिलच्या सुरवातीच्या तीन दिवसांतही मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडलेले आहेत. 

"कोरोना वाढण्याला गर्दी हे कारण आहे. सुरक्षेसाठी लोकांनी एकत्र येणे टाळले पाहिजे. मास्क, सॅनिटायझरचा वापरही केला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे."

- डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com