चिंताजनक : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 20 रुग्ण...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

रत्नागिरी तालुक्यावरील कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे.

रत्नागिरी - जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर आता 20 ते 35 च्या टप्प्याने पडू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दोन दिवसांपूर्वी एकमद 35 रुग्ण सापडल्यानंतर आज नवीन 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कारागृहोतील एक कैदी सापडल्याने प्रशासन हल्ले आहे. आता रत्नागिरी कारागृहात ही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या आता 580 व पोहचली आहे.

रत्नागिरी तालुक्यावरील कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या 20 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये शिरगाव (ता. रत्नागिरी)-03, जेल रोड (ता. रत्नागिरी)-02, मालगुंड (ता. रत्नागिरी) -01, गावडे आंबेरे (ता. रत्नागिरी)-01, राजिवडा (ता. रत्नागिरी)-01, घरडा कॉलनी लवेल (ता. खेड)-06,  कुंभारवाडा (ता. खेड)-01, पायरवाडी कापसाळ (ता.चिपळूण)-02, पेठमाप चिपळूण-01, गोवळकोट (ता.चिपळूण)-01, जुनी कोळकेवाडी (ता.चिपळूण)-01, या रुग्णांचा समावेश आहे. यापूर्वी जिल्ह्यामध्ये  कमी प्रमाणात रुग्णा सापडत होते. मात्र त्याची संख्या आता वाढू लागली आहे. विशेष करून रत्नागिरी तालुक्याला कोरोनाने चारीबाजूने घेरल्याचे आकडेवरीवरून स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता शिरकाव चिंतेची बाब आहे.
 

  • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - 580
  • बरे झालेले रुग्ण - 430
  • मृत्यू - 25
  • एकूण अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह - 125 + 1

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive patient found in ratnagiri district