esakal | दिलासादायक; रत्नागिरीचा पॉझिटिव्हिटी दर घटला
sakal

बोलून बातमी शोधा

दिलासादायक; रत्नागिरीचा पॉझिटिव्हिटी दर घटला

दिलासादायक; रत्नागिरीचा पॉझिटिव्हिटी दर घटला

sakal_logo
By
टीम ई सकाळ

रत्नागिरी : आपत्तीत अकडलेल्या जिल्हावासीयांना (ratnagiri district) कोरोना प्रादुर्भातील घट दिलासादायक ठरणार आहे. मागील आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर (positivity rate) ३.८३ टक्केवर आला आहे. राज्यात रत्नागिरी दहाव्या क्रमांकावर असून हा दर २ टक्केपेक्षा कमी येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या दररोज २०० ते ३०० च्या आसपास बाधित सापडत आहेत.

दुसऱ्या लाटेत कोरोनावर (covid-19) नियंत्रण ठेवण्यात रत्नागिरी जिल्हा अपयशी ठरला. राज्यात पहिल्या दोन क्रमांकात रत्नागिरी होती. राज्यस्तरावरून आलेल्या दट्ट्यानंतर जून महिन्यात जिल्हा प्रशासनाकडून कडक मोहीम सुरू केली. नव्याने पदभार घेतलेल्या जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दररोज आढावा घेण्यास सुरवात केली. त्यामुळे आरोग्य, महसूल यंत्रणा सतर्क होती. मागील आठवड्यात बाधित सापडण्याची संख्या दीडशे ते पावणेतीनशेच्या दरम्यान होती.

हेही वाचा: पोलिसांचे ट्विट, महापूर नियंत्रणात हिट; व्यवस्थेवरील ताण झाला कमी

मागील दहा दिवसांमध्ये १ हजार ५६७ कोरोनाबाधित सापडले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत बाधित सापडण्याचे प्रमाण कमीच राहिले. बरे होणाऱ्यांचा टक्का ९० वरून ९३ वर पोचला आहे. तीन टक्क्यांनी झालेली वाढ कोरोनातून जिल्हा बाहेर पडण्यासाठी दिलासादायक आहे. गेल्या पंधरा दिवसातील आरोग्य, महसूलसह सर्वच यंत्रणांनी केलेल्या कामगिरीमुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्केपेक्षा खाली आला आहे. हा दर २ टक्केपेक्षा कमी झाला तर रत्नागिरी कोरोना नियंत्रण जिल्ह्यांच्या यादीत पोचले. त्यासाठी दिवसाला होणार्‍या चाचण्यांमध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे.

सध्या पूर, दरड कोसळण्याच्या घटनांमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. तुलनेत चाचण्यांची संख्या २२, २३ जुलै वगळता कमी झालेली नाही. पुढील आठवड्यात ग्रामीण भागावर लक्ष्य केंद्रित केली जाणार असून जास्त बाधित असलेल्या गावांमध्ये कोरोना उद्रेकजन्य गाव म्हणून जाहीर केले जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदर अजूनही २.८० टक्केच्या दरम्यान आहे. दिवसाला चार ते पाचजणांचा मृत्यू होत आहेत.

हेही वाचा: पंचनामे करून लवकरच पॅकेजची घोषणा - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

दहा दिवसात बाधितांची आकडेवारी अशी

  • १९ जुलैला ३६४

  • २० जुलैला २३३

  • २१ -- १५६

  • २२ -- २८०

  • २३ -- १५९

  • २४ -- १४०

  • २५ -- २०५

  • २६ -- ३२२

  • २७ -- २९०

  • २८ -- २८२

"चाचण्यांची संख्या वाढल्याने बाधित शोधणे सोपे झाले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढल्याने प्रसारावर नियंत्रण राहू शकते. अजूनही दोन टक्केपेक्षा दर खाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत."

- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक

हेही वाचा: कळणे खनिज प्रकल्पाचा फुटला बांध ; शेतीचे लाखोंचे नुकसान

आरटीपीसीआरची संख्या वाढवली

आरटीपीसीआरच्या ६० टक्के तर अ‍ॅण्टिजेनच्या ४० टक्के चाचण्या केल्या जातात. त्यासाठी मुंबईतील थायरो केअर युनिटची मदत घेण्यात आली आहे. अडीच ते तीन स्वॅब रत्नागिरीतील प्रयोगशाळेत तर चिपळूण डेरवणमध्ये पाचशे स्वॅब तपासले जातात. उर्वरित स्वॅब मुंबईत पाठविण्यात येतात.

loading image
go to top