Corona Impact : 'आगीतून फोफाट्यात' मच्छीमारांची झालीय अवस्था...

corona viras impact fishing in harne ratnagiri  kokan marathi news
corona viras impact fishing in harne ratnagiri kokan marathi news

हर्णे (रतनागिरी) : कोरोना व्हायसरचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पसरू नये म्हणून संपूर्ण देशभरातील सर्व यंत्रणा, उद्योगधंदे बंद ठेवण्याचा सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. तसेच २२ तारखेला जनता कर्फ्यु आणि आता जनतेला घरातच थांबवण्यासाठी १४४ कलम आणि काल (ता.२३) पासून सरकारने संचारबंदी लागू केल्याने हर्णे बंदरातील सर्व व्यवहार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल एकदम ठप्प झाली आहे. या १५ दिवसांच आर्थिक नुकसान कस भरून काढायचं ? असा प्रश्न येथील मच्छिमारांना पडला आहे.

दरम्यान, १ ऑगस्टपासून चालू झालेल्या हंगामानंतर क्यार वादळासारखी वादळे येऊन गेली. त्यातही मच्छीमार या वादळांना तोंड देत उद्योगासाठी उभा राहिला होता. पण दिवसेंदिवस मासळीचा दुष्काळ वाढत चालला असल्याच चित्र या हंगामात दिसून येत होतं.कारण मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांकडून मासळीची आवकच कमी येऊ लागली आहे. याला कारण म्हणजे एल.ई.डीच्या सहाय्याने होणारी मासेमारी व केरळ मल्फीमधून येणाऱ्या फास्टर नौकांद्वारे होणाऱ्या मासेमारीमुळे या पारंपरिक मच्छीमारांना मासळीच मिळेनाशी झाली आहे.

रोज कमवायच आणि रोज खायचं आता काय ?

या लढ्याला अनेकप्रकारे मच्छीमाराना तोंड देऊन सुद्धा काहीही फरक पडला नाही एल.ई.डी द्वारे राजरोसपणे मासेमारी चालू आहे. याला मागील सरकार काय आणि विद्यमान सरकार काय काहीही करू शकत नाही. हे आता मच्छीमाराना ज्ञात झाले असल्यामुळे मच्छीमार एल.ई.डी मासेमारीपुढे हतबल झाला आहे. अगदी बऱ्याचश्या नौकामालकांनी आपल्या नौका किनाऱ्यावरदेखील घेतल्या. हे नुकसान सावरत नाही तोवर कोरोनाच संकट येऊन ठेपल आहे. म्हणजे ' आगीतून फोफाट्यात गेल्यासारखी' येथील मच्छीमारांची अवस्था झाली आहे. अजून एल.ई.डीच संकट जातही नाही आणि जाणारही नाही. तोवर या कोरोना व्हायरसमूळे मासेमारी उदयोग बंदच ठेवावा लागला आहे.

शेवटचा  तरी  मासळी हंगाम मिळेल का ?

या व्हायसरचा प्रादुर्भाव जोरदार पसरू नये याकरिता मासेमारी, बंदरावर होणारा लिलाव, बंदरामध्ये मासेमारीवर उद्योगावर अवलंबून असणारे सर्व उद्योग, बर्फ कारखाने, डिझेल विक्री, नौकांसाठी लागणारे हार्डवेअर सामानाची दुकाने, मासेमारीची विक्री, मच्छीचे सेंटर आदी सर्व व्यवहार एकदम क्षणात ठप्प झाले आहेत. त्यामुळे येथील मच्छीमार भांबावून गेला आहे. याच बंदरामध्ये रोज कमवायच आणि रोज खायचं अशा तत्वावर राबणाऱ्यांची तर चांगलीच उपासमार होणार आहे. काय करायचं ?, कस जगायचं ? हे कधी थांबणार ? शेवटचा मासळी हंगाम मिळेल का ? सगळा खर्च नौकामालकाच्या अंगावर पडणार असून हे नुकसान कस भरून काढायचं ? असे अनेक हतबल करून टाकणारे प्रश्न येथील मच्छिमारांना पडत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com