रस्ता अडवला, खडा पहारा ; पाचल गाव झाले स्वतःहून क्वारंटाईन..

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क होत संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर पाचल ग्रामपंचायतीने संपूर्ण गावाने क्वारंटाईन करून घेतले आहे.

;

राजापूर (रत्नागिरी) : कोरोनाचा दिवसागणिक प्रादुर्भाव वाढत असताना तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीने संपूर्ण गावच स्वतःहून क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करताना गावातून बाहेर जाणारे आणि बाहेरून गावात येणार्‍यांना बंदी घातली आहे. त्यासाठी गावात येणारे सर्व मार्ग बांबू आडवे टाकून बंद करून त्याठिकाणी लोकांनी खडा पहारा सुरू केला आहे. पाचल गावाने बाहेरून येणार्‍या, तर आतून बाहेर जाणार्‍या लोकांना गावबंदी जाहीर केली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने स्वतःहून असा निर्णय घेणारे पाचल तालुक्यातील पहिले गाव ठरले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्क होत संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर पाचल ग्रामपंचायतीने संपूर्ण गावाने क्वारंटाईन करून घेतले आहे. बाहेरून गावात येणार्‍या चारही मार्गावर बांबूच्या सहाय्याने अडथळे निर्माण करण्यात आले असून त्या त्या ठिकाणी गावातील सुमारे 25 तरुणांची देखरेखीसाठी नेमणूक करण्यात आल्याची माहिती सरपंच अपेक्षा मासये यांनी दिली.

हेही वाचा- कामाच पैसे मिळाल्यावर धान्य आणू ; आता गर्दीत गर्दी नको.. अस ती म्हणाली अन्

बाहेर जाणे आणि येणार्‍यांना बंद​

यासाठी रायपाटण आउटपोस्ट पोलिस ठाण्याचे काही पोलिस कर्मचारी तैनात आहेत. या 25 तरुणांना दोन-दोन तासांच्या अंतराने आळीपाळीने डुट्या देण्यात आल्या आहेत. या चारही मार्गावरुन बाहेरील कोणत्याही ठिकाणची व्यक्ती गावात येणार नाही याची खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती उपसरपंच किशोर नारकर यानी दिली. पाचलची लोकसंख्या 4 हजार 930 असून जनजागृतीसाठी वाहनावर स्पीकर लावून लोकाना कोरोना संदर्भात माहिती देण्यात येत आहे. त्यातच खबरदारी म्हणून मेडिकल व किराणा वगळता सर्व बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. मात्र या बंदचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसू नये यासाठी गावच्या सरपंच अपेक्षा मासये , उपसरपंच किशोर नारकर व ग्रामविकास अधिकारी अर्जुन नागरगोजे जातीनीशी लक्ष्य ठेवून आहेत .

हेही वाचा- गड्या आपला गाव बरा म्हणत 40000 लोक दाखल ; 13 हजार कर्मचारी लढ्यासाठी सज्ज ​

तरुण आणून देतात आवश्यक वस्तू

गावबंदी काळात गावातील नागरिकांना जास्त त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामध्ये कुणाला जीवनावश्यक वस्तूंसह अन्य वस्तू लागल्यास त्या लोकांना थेट दुकानावर जावे लागत नाही. त्यासाठी नाक्यानाक्यावर कार्यरत असलेले तरुण लोकांना आवश्यक त्या वस्तू दुकानातून खरेदी करून देतात.गावबंदी काळात गावातील नागरिकांना जास्त त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामध्ये कुणाला जीवनावश्यक वस्तूंसह अन्य वस्तू लागल्यास त्या लोकांना थेट दुकानावर जावे लागत नाही. त्यासाठी नाक्यानाक्यावर कार्यरत असलेले तरुण लोकांना आवश्यक त्या वस्तू दुकानातून खरेदी करून देतात.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchal village became Quarantine by itself kokan marathi news