esakal | कोरोनामुळे सिंधुदुर्गात ही खबरदारी....

बोलून बातमी शोधा

corona virus effect in sindhudurg

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जेथे गर्दी होणार असे कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार (ता.8) जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेतर्फे होणारे कृषी पशु प्रदर्शन मेळावा या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द किंवा पुढे ढकलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

कोरोनामुळे सिंधुदुर्गात ही खबरदारी....
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी - कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर जेथे गर्दी होणार असे कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार (ता.8) जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी दिले आहेत. जिल्हा परिषदेतर्फे होणारे कृषी पशु प्रदर्शन मेळावा या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रद्द किंवा पुढे ढकलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. हा व्हायरस अन्यत्र पसरत असल्याने देशाची आणि राज्याची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. यावर उपाययोजना करण्यात येत आहे. जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणा आवश्‍यक उपाययोजना राबवित आहे. असे असतानाच हा व्हायरस एकाकडून दुसऱ्याकडे पसरणारा असल्याने खबरदारी म्हणून शासनाने गर्दी होणारे सर्व शासकीय कार्यक्रम, उपक्रम, कार्यशाळा, बैठका आदी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सुचना सर्व विभागांना आयुक्तांमार्फत देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जागतिक महिला दिनांनिमित्त आयोजित करण्यात आलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात यावेत, असे आदेश सर्व विभागांना दिले आहेत. 

कृषी प्रदर्शन पुढे जाण्याची शक्‍यता 
कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर ज्या ठिकाणी गर्दी होणार, असे कार्यक्रम रद्द करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे हे कोरोनाचे सावट जिल्हा परिषदेच्या कृषी पशु प्रदर्शनावर दिसत आहे. त्यामुळे हे प्रदर्शन रद्द होण्याची किवा पुढे ढकलण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.