कोरोनाची धास्ती ; मास्कची किंमत पाहून व्हाल थक्क

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 मार्च 2020

जगभराच कोरोनाच्या भितीने थैमान घातले असताना रत्नागिरीत कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्कचा गोरखधंदा सुरु झाला आहे. मुळ किंमत 170 रुपये असलेल्या मास्कसाठी रत्नागिरीत 260 रुपये घेतले जात असल्याचे समोर आले आहे.

रत्नागिरी : जगभराच कोरोनाच्या भितीने थैमान घातले असताना रत्नागिरीत कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्कचा गोरखधंदा सुरु झाला आहे. मुळ किंमत 170 रुपये असलेल्या मास्कसाठी रत्नागिरीत 260 रुपये घेतले जात असल्याचे समोर आले आहे.

हे पण वाचा -  कोरोनावर हाच एकमेव उपाय 

रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर परिसरातील मेडिकल शॉपमध्ये कोरोना व्हायरसपासून बचाव होण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या N 95 या मास्कची किंमत 260 सांगण्यात आली. काही दिवसांपूर्वी या मास्कची किंमत 170 रुपये इतकी सांगण्यात येत होती. तर 25 मास्क असलेल्या पाकिटाची किंमत 6 हजार रुपये सांगण्यात आली आहे. 

N 95 या मास्कची विक्री रत्नागिरीत काळ्या बाजाराने होत आहे. ठराविक मेडिकल दुकान वगळता इतर दुकानात मात्र N 95 या मास्कचा तुटवडा आहे. कारण रत्नागिरी शहराला पुरवठा करणाऱ्या मुख्य स्टाँकिस्टच ही मास्क पुरवत नाही. शहरात N 95 मास्कचा तुटवडा असल्याची माहीत मेडिकलधारकांनी दिली. 

हे पण वाचा -  इगो दुखावला की कायदा अन्‌ गोरगरीबांना इंग्लिशमधून शिव्या 

दरम्यान, जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे भारतातही २८ रूग्ण आढले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून N 95 हे मास्क वापरले जात आहेत. परंतु, लोकांमधील भितीचा फायदा घेवून काही मेडिकलधारक आपल्या तंगड्या भरत आहेत. लोकांची ही लूबाडणूक थांबवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. देशभरात २८ रूग्ण आढळले असले तरी महाराष्ट्रात अध्याप एकही रूग्ण आढला नाही. त्यामुळे राज्यातील लोकांनी घाबरण्याची गरज नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus mask seal for high rate in maharashtra