ब्रेकिंग- तो ठरला रत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी....

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून रत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. र

खेड (रत्नागिरी) : रत्नागिरीतील खेड येथील कोरोना रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती दुबईहून खेड येथे आली होती. खेड रुग्णालयात उपचारादरम्यान  त्याचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला असून रत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी ठरला आहे. रत्नागिरीत आतापर्यंत 4 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. गुहागर येथील पॉझिटिव्ह रूग्ण पूर्णपणे बरा झाला आहे. तर आता 2 रूग्ण शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हेही वाचा- लॉकडाऊनमुळे माणसांप्रमाणे मुक्या प्राण्यांचेही खाण्या-पिण्याचे हाल होत आहेत. त्यामुळे अन्नाच्या शोधात त्यांनी आपला मोर्चा जंगलाकडे वळविला आहे. वाचा सविस्तर

खेड तालुक्यातील कळंबणी येथील शासकीय रुग्णालयात हा रुग्ण 6 एप्रिलला दाखल झाला होता. या रुग्णाचा मुत्यु झाला आहे. हा रुग्ण दुबईहून भारतात आला. त्यानंतर खेड येथे आला होता. कोरोनामुळे रूग्ण मुत्यु होण्याची रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. प्रशासनानं तत्काळ अलसुरे गाव सील केले असून तेथील लोकांचा सर्व्हे करण्याचे काम सुरु आहे. प्रशासन सतर्क झाले असून सगळी यंत्रणा कार्यन्वित झाली आहे.

 तहसीलदार समीर घारे यांचे महत्वाचे अवाहन

खेड मधील  त्या कोरोनाच्या मृत व्यक्तीस कोण हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले असल्यास तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात संपर्क करा.तसेच  दापोली तालुका न सोडण्याचे आवाहन  केले  आहे. शहर,गाव सोडू नका. आहात तिथेच घरात सुरक्षित रहा.दापोली तालुक्यात कुणालाही अन्य तालुक्यातुन प्रवेश दिला जाणार नाही                   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronaviras first victim in Ratnagiri kokan marathi news