esakal | लाॅकडाउनची झळ गणेशोत्सवाला, मूर्तीकारांनी काय व्यक्त केली खंत? वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus impact ganeshotsav konkan sindhudurg

गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच असल्याने उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी येथील कारागिर रात्रंदिवस मेहनत करत आहेत.

लाॅकडाउनची झळ गणेशोत्सवाला, मूर्तीकारांनी काय व्यक्त केली खंत? वाचा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कडावल (सिंधुदुर्ग) - गणेशोत्सव नजिक आल्याने परिसरातील मूर्तीशाळांमधील लगबग वाढली असून गणेश मूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सुरू केलेल्या लॉकडाउनचे परिणाम या व्यवसायावरही झाले असून यंदा शाडू माती तसेच रंग साहित्याच्या किंमतीत किमान 15 टक्के वाढ झाल्याची माहिती येथील मूर्तीकार अनंत मेस्त्री यांनी दिली. 

कडावल परिसरात अनेक मूर्तीशाळा आहेत. गणेशोत्सव आता नजीक आल्याने या मूर्तीशाळांमधली लगबग वाढली आहे. बहुतेक शांळामध्ये गणेशाच्या मूर्ती बनवून पूर्ण झाल्या असून या मूर्तीना रंग देण्याचे काम जोरदार सुरू आहे. गणेशोत्सवाला अवघे काही दिवसच असल्याने उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्यासाठी येथील कारागिर रात्रंदिवस मेहनत करत आहेत.

ओरोस खुर्द येथील तुकाराम मेस्त्री, अनंत मेस्त्री व दिवाकर मेस्त्री हे गेल्या कित्येक वर्षांपासून गावात गणेश मूर्तीशाळा चालवत आहेत. मेस्त्री बंधूनी या वर्षीपासून कडावल येथेही दुसरी मूर्तीशाळा नव्याने सुरू केली आहे. या शाळेत अनेक सुबक गणेश मूर्ती विक्रीस उपलब्ध आहेत. मूर्तींची कमीतकमी किंमत एक हजार रूपये ठेवली आहे. 

मेस्त्री बंधूंपैकी अनंत मेस्त्री यांची भेट घेवून त्यांना या व्यवसायासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ""गणेश मूर्ती बनविणे हे फार जबाबदारीचे काम आहे. ते वेळेत पूर्ण होणे गरजेचे असल्याने संबंधित मूर्तीकारांना वेळेचे भान ठेवावे लागते. साहित्याच्या सतत वाढणाऱ्या किंमतीमुळे मूर्तींची किंमतही नाईलाजास्तव वाढवावी लागत आहे. लॉकडाउनमुळे यंदा मूर्तीकामाच्या रंगसाहित्यात सुमारे 15 टक्के वाढ झाली आहे. शाडू मातीच्या 40 किलोच्या गोणीची किंमत गतसाली 250 रुपये होती. ती यंदा 300 रुपयांवर पोहचली आहे.'' 

संपादन - राहुल पाटील

loading image
go to top