सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 4 रुग्ण 

विनोद दळवी
Monday, 22 February 2021

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 6 हजार 391 रुग्ण मिळाले आहेत. यातील 6 हजार 34 रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. 173 रुग्णाचे निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात 178 रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत. यातील 6 रुग्ण जिल्ह्याबाहेर जावून उपचार घेत आहेत.

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज नवीन 4 कोरोना रुग्ण आढळले. तर 178 रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत. यातील दोन रूग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते ऑक्‍सीजनवर उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 6 हजार 391 रुग्ण मिळाले आहेत. यातील 6 हजार 34 रुग्णानी कोरोनावर मात केली आहे. 173 रुग्णाचे निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात 178 रुग्ण उपचाराखाली राहिले आहेत. यातील 6 रुग्ण जिल्ह्याबाहेर जावून उपचार घेत आहेत. उर्वरित 172 रुग्णावर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यानी दिली. 

178 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी 2 रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. हे दोन्ही रुग्ण ऑक्‍सीजनवर उपचार घेत आहे. जिल्ह्याबाहेर जावून सहा रुग्ण उपचार घेत आहेत. आर.टी.पी.सी.आर टेस्ट मध्ये 35 हजार 298 नमुने तपासण्यात आले. यातील 4 हजार 421 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 66 नमूने घेण्यात आले. न्टिजन टेस्टमध्ये एकूण 25 हजार 122 नमुने तपासले. पैकी 2 हजार 84 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 125 नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 60 हजार 420 नमूने तपासण्यात आले. 

पॉझिटीव्ह रुग्ण व कंसात मृत्यू असे ः देवगड 440 (10), दोडामार्ग 361 (5), कणकवली 1951 (45), कुडाळ 1443 (33), मालवण 590 (18), सावंतवाडी 839 (43), वैभववाडी 185 (8), वेंगुर्ले 555, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 27 (1). तालुकानिहाय सक्रीय रूग्ण ः देवगड - 6, दोडामार्ग - 7, कणकवली - 57, कुडाळ - 32, मालवण - 39, सावंतवाडी - 18, वैभववाडी - 2, वेंगुर्ले - 8 व जिल्ह्याबाहेरील 9. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact konkan sindhudurg