चिंताजनक! आणखी तिघे बाधित, संख्या शंभरीकडे, कोणता हा तालुका?

भूषण आरोसकर
Monday, 17 August 2020

आता कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 20 झाली आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून 14 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. ते घरी परतले आहेत. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग)- शहरात रूग्णसंख्येत वाढ होत असून माठेवाडा आणि भटवाडी येथे एकूण तीन रूग्ण आढळले. कुडाळ येथे गेल्यामुळे दोघे पॉझिटिव्ह निघाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. 

माठेवाडा परिसरात कंटेन्मेंट झोन लागू झाला आहे. तर भटवाडी येथेही एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. सोनुर्ली येथेही दोन महिला शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. तालुक्‍याची शतकाकडे वाटचाल सुरू असून आतापर्यंत 97 एवढी रुग्णसंख्या झाली आहे. संबंधित महिला भटवाडी येथे होमक्वारंटाईन होती. तिचा स्वॅब टेस्ट आज पॉझिटिव्ह आला.

वाचा - सावंतवाडीला पावसाने झोडपले; तेरेखोल नदीने ओलांडली पुन्हा धोक्याची पातळी

माठेवडा येथील दोघेजण कुडाळला गेले होते. त्यांची कुडाळ येथे तपासणी केली असता ते पॉझिटीव्ह निघाले. सद्यस्थितीत शहरात 5 सक्रीय कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यामुळे आता कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 20 झाली आहे. यातील एकाचा मृत्यू झाला असून 14 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. ते घरी परतले आहेत. 

हेही वाचा - Good News : आता मध्य रेल्वे धावणार कोकण रेल्वे मार्गावर 

शहरातील माठेवाडा येथील 50 मिटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये 28 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापने, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदान्वये कारवाई करण्यात येणार आहे. सोनुर्ली येथील 2 महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. या दोन्ही महिला होम क्वारंटाईन होत्या. तालुक्‍याची रुग्णसंख्या 97 झाली आहे. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact sawantwadi konkan sindhudurg