सिंधुदुर्गात २७ जण ठणठणीत, सात नवे रुग्ण

विनोद दळवी 
Tuesday, 27 October 2020

जिल्ह्यात काल 34 कोरोना बाधित आढळले होते. त्यामुळे बाधितांची संख्या 4 हजार 715 झाली होती. आज 7 मिळाल्याने ही संख्या 4 हजार 722 झाली आहे.

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज नव्याने 7 व्यक्तीचे अहवाल कोरोना बाधित आली आहेत. एकाही व्यक्तीचे निधन झालेले नाही. 27 व्यक्तीनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त संख्या 4 हजार 76 झाली आहे. 

जिल्ह्यात काल 34 कोरोना बाधित आढळले होते. त्यामुळे बाधितांची संख्या 4 हजार 715 झाली होती. आज 7 मिळाल्याने ही संख्या 4 हजार 722 झाली आहे. जिल्ह्यातील सक्रीय रुग्णाची संख्या पुन्हा 500 च्या वर स्थिरावली आहे. 502 रुग्ण सक्रीय असून यातील 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

502 रुग्ण सक्रिय असून त्यापैकी 7 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात 4 ऑक्‍सिजनवर तर तीन व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. आर.टी.पी.सी.आर टेस्ट मध्ये 19 हजार 203 नमुने तपासण्यात आले. यातील 3 हजार 422 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. न्टिजन टेस्टमध्ये एकूण 13 हजार 216 नमुने तपासले पैकी 1 हजार 422 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत एकूण 32 हजार 419 नमूने संख्या झाली आहे. आज नव्याने 389 नमूने घेण्यात आले आहेत. 

रुग्णसंख्येवर एक नजर 
तालुका रुग्ण मृत 
देवगड 304 8 
दोडामार्ग 220 2 
कणकवली 1517 29 
कुडाळ 1092 25 
मालवण 394 14 
सावंतवाडी 624 31 
वैभववाडी 137 7 
वेंगुर्ले 458 9 
जिल्ह्याबाहेरील 13 1 

तालुका निहाय सक्रीय रुग्ण 
देवगड - 19, दोडामार्ग - 34, कणकवली - 111, कुडाळ - 126, मालवण - 54, सावंतवाडी - 60, वैभववाडी - 2, वेंगुर्ले - 92 अशाप्रकारे आहेत. 

दोन वृद्ध व्यक्तीचा मृत्यू 
कुडाळ तालुक्‍यातील नेरूर येथील 60 वर्षीय महिलेचा काल (ता.25) कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. या महिलेस किडनीचा आजार होता. कुडाळ तालुक्‍यातील माणगाव येथील 72 वर्षीय पुरुषाचा ही आज कोविड - 19 मुळे मृत्यू झाला आहे; मात्र त्यांना इतर आजार नव्हते. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact sindhudurg district