सिंधुदुर्गात कोरोनाचा आलेख वाढताच 

विनोद दळवी
Wednesday, 20 January 2021

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधित 6 हजार 96 मिळाले आहेत. यातील 5 हजार 694 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. 164 रुग्णाचे निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात 232 रुग्ण सक्रीय राहिले आहेत.

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आज 18 नवीन कोरोना रुग्ण मिळाले आहेत. 6 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 3 रूग्णांची प्रकृती चिंताजनक असून एकूण 232 रुग्ण उपचाराखाली आहेत. 

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधित 6 हजार 96 मिळाले आहेत. यातील 5 हजार 694 रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. 164 रुग्णाचे निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात 232 रुग्ण सक्रीय राहिले आहेत. येईल 7 रुग्ण जिल्ह्याबाहेर जावून उपचार घेत आहेत. उर्वरित 225 रुग्णावर जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल अथवा होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली. 

232 रूग्ण सक्रिय असून त्यापैकी तीन रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. यातील दोन रुग्ण ऑक्‍सीजनवर तर एक व्हेन्टीलेटरवर उपचार घेत आहे. जिल्ह्याबाहेर जावून सात रुग्ण उपचार घेत आहेत. आर.टी.पी.सी.आर टेस्टमध्ये 29 हजार 994 नमुने तपासण्यात आले. यातील 4 हजार 254 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नव्याने 81 नमूने घेण्यात आले. ऍन्टिजन टेस्टमध्ये एकूण 22 हजार 927 नमुने तपासले. पैकी 1 हजार 968 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आज नवीन 198 नमूने घेण्यात आले. आतापर्यंत एकूण 52 हजार 921 नमूने तपासण्यात आले. 

तालुकानिहाय पॉझिटीव्ह रुग्ण व कंसात मृत्यू झालेले असे ः देवगड 430 (9), दोडामार्ग 352 (4), कणकवली 1852 (41), कुडाळ 1372 (32), मालवण 529 (17), सावंतवाडी 821 (43), वैभववाडी 182 (7), वेंगुर्ले 538, (10) जिल्ह्याबाहेरील रुग्ण 20 (1). तालुकानिहाय सक्रीय रुग्ण ः देवगड - 30, दोडामार्ग - 14, कणकवली - 60, कुडाळ - 54, मालवण - 20, सावंतवाडी - 15, वैभववाडी - 9, वेंगुर्ले - 27 व जिल्ह्याबाहेरील 3. 

संपादन - राहुल पाटील
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus impact sindhudurg district