शिवसेनेची एकला चलो रे भूमिका; पालिका निवडणूक स्वबळावर, वरिष्ठांकडून आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

congress-ncp-shivsena

पालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी व्हावी, यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू

शिवसेनेची एकला चलो रे भूमिका; पालिका निवडणूक स्वबळावर

चिपळूण : चिपळूण पालिकेची आगामी पंचवार्षिक निवडणूक शिवसेना (Shivsena) स्वबळावर लढणार आहे. पालिका निवडणुकीत शिवसेना कोणत्याही पक्षाबरोबर युती किंवा आघाडी करणार नाही, असे शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे पालिका (Coporation election 2021) निवडणुकीसाठी शिवसेनेची एकला चलो रे भूमिका स्पष्ट झाली आहे.

चिपळूण पालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी (NCP-Congress) काँग्रेसची आघाडी व्हावी, यासाठी राष्ट्रवादीकडून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांनी आघाडीसाठी राष्ट्रवादीच्या पार्लमेंटरी बोर्डच्या काही सदस्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांबरोबर आघाडीची चर्चा करण्यासाठी पाठवले होते. काँग्रेसने सत्तेतील समान वाटा मागितल्यानंतर आघाडीची चर्चा फिस्कटली. काँग्रेसमधी (congress) ल काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीबरोबर आघाडी नको, अशी टोकाची भूमिका मांडल्याने राष्ट्रवादी काँग्रेस एकाकी पडली आहे. काँग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आघाडी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेबरोबर आघाडी करेल, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्तेही संभ्रमात पडले होते.

कोणाबरोबरही आघाडी करणार नाही

शहरात सध्या शिवसेनेला चांगले दिवस आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादीबरोबर आघाडी झाली तर शिवसेनेच्या वाट्याला कमी जागा येतील आणि सत्तेतील वाटाही कमी होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती. (Political news) अनेक कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत आणि पक्षाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्याशी संपर्क साधून नव्या आघाडीबाबत विचारणा करण्यास सुरवात केली. तेव्हा या दोघांनी आणि पालिका निवडणुकीत शिवसेना कोणाबरोबरही आघाडी करणार नाही. (konkan news) पक्षाने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहून पालिका निवडणुकीची तयारी करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

"पालिका निवडणुकीत शिवसेना कोणाबरोबरही आघाडी करणार नाही. शिवसेनेतील वातावरण मुद्दाम गढुळ करण्याचा प्रयत्न काहीजणांकडून सुरू आहे. त्यावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये. निवडणुका स्वबळावर लढवण्याचे वरिष्ठांकडून आदेश आहेत. त्याचे पालन केले जाईल."

- शशिकांत मोदी, शिवसेना नगरसेवक.

एक दृष्टिक्षेप..

  • काँग्रेसला हवा होता सत्तेतील समान वाटा

  • काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चर्चा फिस्कटली

  • राष्ट्रवादी काँग्रेस पडली एकाकी

  • शहरात सध्या शिवसेनेला चांगले दिवस

  • खासदार, जिल्हाप्रमुखांचे आघाडी न करण्याचे स्पष्टीकरण

टॅग्स :Shiv Sena