ठरलं! पालिकेतील सर्व जागा राष्ट्रवादी स्वबळावर लढवणार

पदाधिकाऱ्‍यांनी आघाडीबाबत आढावा घेण्यासाठीच्या बैठकीत चर्चा केली होती.
ncp
ncpesakal
Summary

पदाधिकाऱ्‍यांनी आघाडीबाबत आढावा घेण्यासाठीच्या बैठकीत चर्चा केली होती.

रत्नागिरी : आगामी रत्नागिरी पालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वच्या सर्व प्रभागांत लढायची तयारी करत आहे. अजूनही शिवसेनेबरोबर आघाडी करण्याचा कोणताच प्रस्ताव पक्षाकडे आलेला नाही, अशी माहिती प्रदेश नेते बशीर मुर्तूझा यांनी दिली. राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रांतिक सदस्य कुमार शेट्ये, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद कीर, शहराध्यक्ष नीलेश भोसले आदी उपस्थित होते.

मुर्तूझा म्हणाले, 'शहरातील पालिकेच्या सध्याच्या कारभारावर नागरिकांची प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे मोठ्या अपेक्षेने लोक राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहत आहेत. त्या लोकांचा अपेक्षाभंग होऊ नये, यासाठी राष्ट्रवादीतर्फे स्वबळावर निवडणूक लढण्याचा हा प्रयत्न आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्‍यांनी आघाडीबाबत आढावा घेण्यासाठीच्या बैठकीत चर्चा केली होती. त्या वृत्तामुळे राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. आघाडीबाबत कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादीकडे आलेला नाही. यासाठी शिवसेनेकडून पुढाकार घेतला पाहिजे. त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर स्थानिक पातळीवर सर्वांशी चर्चा करुन वरिष्ठांकडे अहवाल पाठविला जाईल. वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. २३ डिसेंबरला मुदत संपत असल्यामुळे त्यानंतर प्रभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. निवडून येणाऱ्या राष्ट्रवादीच्या कोणत्याही उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही.'

ncp
भाजपचा एल्गार! सर्वात श्रीमंत महापालिकेच्या सर्वच्या सर्व 227 जागा स्वबळावर लढवणार

पालिकेची निवडणूक नगरसेवक सुदेश मयेकर यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यात येणार आहे. त्यांनी आतापर्यंत चांगल्या पध्दतीने काम केले आहे. शहरातील नागरिकांमध्येही चांगली प्रतिमा आहे. मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरविण्यात येईल, असे मुर्तूझा यांनी सांगितले. राष्ट्रवादीत गटा-तटाचे राजकारण नाही. मतभेद होते, ते मिटले आहेत. राष्ट्रवादीच्या चिन्हावर पाच नगरसेवक निवडून आले असले तरीही त्यापैकी सुदेश मयेकरच कार्यरत आहेत. उर्वरितांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पुन्हा कुणी इच्छुक असले तर त्यांची क्षमता पाहून निर्णय घेण्यात येईल. अन्य पक्षातून आयत्यावेळी येणाऱ्यांचा विचार निवडणुकीवेळच्या परिस्थितीवरच राहील, असे त्यांनी सांगितले.

निधी महाविकास आघाडीने दिलाय

रत्नागिरी शहरासाठी जो विकास निधी आला तो राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडून आलेला आहे. तो निधी महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे, असे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी सांगितले. शासनाकडून आलेला निधी खर्च करताना पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून योग्य नियोजन करण्यात आलेले नव्हते. त्याचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागला असल्याचेही कीर यांनी सांगितले.

ncp
देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं; सख्खे 4 भाऊ 'आमदार'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com