esakal | मंत्रीपदासाठी कोऱ्या लेटरहेडवर सह्या मोहीम; पण कुणासाठी ?
sakal

बोलून बातमी शोधा

Correspondence Campaign On Letterhead For Minister

राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एकमेव आमदार शेखर निकमही मंत्रीपदासाठी प्रयत्न करीत आहेत. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे हिला मंत्रीपद मिळावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तटकरे यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर वर्चस्व आहे.

मंत्रीपदासाठी कोऱ्या लेटरहेडवर सह्या मोहीम; पण कुणासाठी ?

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण ( रत्नागिरी ) - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आता मंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीतील एका नेत्याचे कोरे लेटरहेड सह्यांसाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडे फिरवले जात आहे. ते शेखर निकमांसाठी की आदिती तटकरेंसाठी याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे आता मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. त्यात आपल्याला स्थान मिळावे, यासाठी जिल्ह्यातील शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रयत्नशील आहेत. गुहागरचे आमदार भास्कर जाधव, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्यात मंत्रीपदासाठी स्पर्धा आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी आणि आदित्य ठाकरेंचे विश्‍वासू असलेले योगेश कदमही मंत्रीपदासाठी प्रयत्नकरीत आहेत. शिवसेनेकडून कोणाला मंत्रीपद मिळेल हे काही दिवसात स्पष्ट होईल. 

हेही वाचा - राष्ट्रवादी लढणार  ही  निवडणूक शिवसेनेच्या विरोधात 

आदिती तटकरेंना कॅबिनेट मंत्रीपद हवे

राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एकमेव आमदार शेखर निकमही मंत्रीपदासाठी प्रयत्न करीत आहेत. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे हिला मंत्रीपद मिळावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. तटकरे यांचे रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादीवर वर्चस्व आहे. भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर तटकरेंना आता स्पर्धक राहिलेला नाही. आदिती तटकरेना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे तसेच रत्नागिरी किंवा रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तटकरेंच्या मंत्रीपदासाठी रत्नागिरी जिल्ह्यातूनही पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी सह्यांची मोहीम राबवली जात आहे. मात्र राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याचे कोरे लेटरहेड सह्यांसाठी फिरवले जात आहे ते शेखर निकमांसाठी की आदिती तटकरेसाठी याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. 

माहिती द्यावी नंतरच आम्ही सह्या करू

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याचे कोरे लेटरहेड रत्नागिरी येथे सह्यांसाठी पाठविण्यात आले होते. रत्नागिरीतील कार्यकर्त्यानी त्या लेटरहेडवर सह्या न करताच ते परत पाठवले. आमची सही शेखर निकमांसाठी घेतली जात आहे की आदिती तटकरेंसाठी याचे स्पष्टीकरण व्हावे पत्रात मजकूर काय लिहला जाईल याची माहिती द्यावी नंतरच आम्ही सह्या करू असे रत्नागिरीतील एका पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

हेही पाहा - महाविकास आघाडीमुळे राणेंना येथे बसणार धक्का