लाचखोर तलाठ्याला पोलिस कोठडी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 डिसेंबर 2016

रत्नागिरी : जमीन खरेदीखताची नोंद करून त्याप्रमाणे सात-बारा मिळावा यासाठी चार हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याला न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चंद्रकांत गणू आगरे (वय 49) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

ही घटना काल (ता. 8) सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास तालुक्‍यातील उक्षी येथे घडली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती. आगरे उक्षी येथे तलाठी होते. त्यांच्याकडे करबुडे कार्यालयाचा अतिरिक्त पदभार होता. तक्रारदारांनी मासेबाव येथे जमीन खरेदी करून खरेदीखत केले होते. या खरेदीखताची नोंद सात-बाराला करून नवा सात-बारा मिळावा, यासाठी तक्रारदारांनी तलाठ्यांकडे मागणी केली होती; मात्र नोंदीचा तसा नवा सात-बारा देताना तलाठी चालढकल करीत होते. त्यांनी तक्रारदाराकडे या कामासाठी चार हजारांची लाच मागितली.

यांसदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. काल उक्षी तलाठी कार्यालयात चारपैकी दोन हजारांची रोकड घेताना लाचलुचपत विभागाने रंगहाथ पकडले होते. संशयित तलाठ्याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने उद्यापर्यंत (ता. 10) पोलिस कोठडी सुनावली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corrupt talathi sent to police custody