nursery school
nursery schoolnursery school

यंदातरी शाळेची घंटा वाजेल का?

कणकवली (सिंधुदुर्ग): यंदाही शाळेची (School)पहिली घंटा वाजणार का नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संक्रमित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यंदाचे १४ जूनपासून सुरू होणारे शैक्षणिक प्रथम सत्र लांबण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाच्या पहिल्या आदेशाप्रमाणे १४ जूनपासून ऑनलाईन शाळा सुरू होतील, असे जाहीर केले होते; मात्र अद्याप सुधारित कोणताही आदेश आला नसून पावसामुळे यंदा ऑनलाईन शिक्षणालाही मर्यादा येणार आहेत. त्याच शाळा इमारतींत कोरोना विलगिकरण कक्ष असून शिक्षकांना (teacher)कोरोनाच्या कामाला जुंपले आहे. त्यामुळे यंदाही शैक्षणिक वर्ष कसे जाणार याबाबत शंका आहे. (covid-19-impact-school-education-sindhudurg-marathi-news)

गतवर्षीपासून जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राची अधोगती कोरोनामुळे सुरू झाली आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या प्रगतीवर मर्यादा आल्या आहेत. शाळा महाविद्यालयांचे सत्र गेल्या वर्षी ऑनलाइन पद्धतीने सप्टेंबरपासून तर ऑफलाइन पद्धतीने नोव्हेंबरपासून सुरु झाले होते. पहिल्या टप्प्यात दहावी ते बारावी दुसऱ्या टप्प्यात सातवी ते नववी आणि तिसऱ्या टप्प्यात पाचवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या; पण परीक्षा सुरू होण्यापुर्वीच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोकेवर काढले. यंदा मात्र शाळेचा शुभारंभ अडचणीत सापडलेला आहे.

जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसाला सरासरी ६०० रुग्ण संक्रमित आढळत आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ३२ हजार ६०० रुग्ण संक्रमित आले असून सध्या स्थिती ६ हजार ७०० सक्रिय रुग्ण आहेत. ग्रामीण भागात कोरोनाची संख्या वाढत असल्याने शाळांच्या इमारतीमध्ये गाव विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत. यामुळे शाळांच्या इमारती सध्या स्थानिक ग्रामपंचायतींच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. परिणामी अशा शाळांमध्ये ऑफलाइन शिक्षण पद्धती सुरू होणे शक्यच आहे.

ऑनलाईन शिक्षण पद्धतीला अनेक मर्यादा आहेत. अलीकडे झालेल्या चक्रीवादळामुळे एकूण इंटरनेट सुविधेचा बोजवारा उडाला आहे. अजूनही यात सुधारणा झालेले नाही. त्यातच पुढच्या काळात मुसळधार पावसाची शक्यता असून परिणामी नेटवर्कची समस्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. जिल्हा डोंगराळ असल्याने नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे याही वर्षी शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे.

..तरच पुढचा निर्णय

जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता. सर्व शिक्षक हे कोरोना सेवेत कार्यरत असल्याने तसेच शाळांच्या इमारती ग्रामपंचायतच्या ताब्यात असल्याने कशा पद्धतीने शिक्षण द्यावे याची नवी गाईडलाईन्स प्राप्त झाल्यानंतरच पुढचा निर्णय घेण्यात येईल, असे श्री. आंगणे यांनी सांगितले.

राज्यातील शाळांच्या सुट्ट्या जाहीर झाल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून सुरू करत असताना ऑनलाइन शिक्षण सुरू करावे, असे आदेश त्याचवेळी शिक्षण संचालकांनी दिले आहेत. यामध्ये अद्याप सुधारित आदेश निघालेला नाही.

- रामचंद्र आंगणे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी

कोरोना लाटेत लहानमुलांना धोका आहे. जोपर्यंत जिल्ह्यातून कोरोनाचा नायनाट होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवणार नाही. गेल्या वर्षी शाळा सुरू केल्या पण अटीशर्थी होत्या. आता कोरोना समुळनष्ट झाल्यावर शाळा प्रत्यक्षात सुरू कराव्यात, अन्यथा ऑनलाईन शिक्षणच द्यावे.

- विद्याधर सावंत, पालक

या आहेत अडचणी

* शिक्षकांना कोरोना ड्यूटी

* शाळांच्या इमारतीत विलगिकरण कक्ष

* जिल्ह्यात ६ हजार ७१७ सक्रीय रूग्ण

* कोरोना सक्रमित ३२ हजार ६००

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com