esakal | अत्यावश्यक सेवांवर निर्बंध नाहीत; शनिवार, रविवार सुरुच
sakal

बोलून बातमी शोधा

lockdown

अत्यावश्यक सेवांवर निर्बंध नाहीत; शनिवार, रविवार सुरुच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग): जिल्ह्यातील जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा शनिवार व रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरुच राहणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे(Resident Deputy Collector Shubhangi Sathe)यांनी दिली आहे. सिंधूदुर्ग जिल्हा चौथ्या टप्प्यात आहे. या टप्प्याला शनिवार व रविवारी अत्यावश्यक व जीवनावश्यक सुविधा बंद ठेवण्याचे निर्बंध नसून इतर दिवसांप्रमाणे सूट असल्याचे त्यांनी सांगितले. (sindhudurg-weekend-lockdown-update-marathi-news)

राज्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पाच टप्पे केले आहेत. यासाठी पाचही टप्प्यासाठी स्वतंत्र निर्बंध घातले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्वतंत्र आदेश काढत ७ जूनपासून जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरु झाली; मात्र या आदेशात शनिवारी व रविवारी अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा सुरु राहिल, असे स्पष्ट होत नाही. त्यामुळे आज जिल्ह्यातील व्यापारी वर्गात संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी साठे यांना विचारले असता त्यांनी शनिवार व रविवारी अत्यावश्यक व जीवनावश्यक सेवा दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा- रत्नागिरीत दोन दिवस पुन्हा रेड अलर्ट; आतापर्यंत 214 मिमी पावसाची नोंद

प्रशासनात सुद्धा संभ्रम

जीवनावश्यक सेवा केवळ शनिवार व रविवारी सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी ५ जूनला काढलेल्या आदेशात म्हटले होते. त्यामुळे कणकवली नगरपालिकेने शनिवार व रविवारी कणकवली बंद राहिल, असे जाहीर केले; मात्र ही बाब निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या लक्षात येताच त्यांनी कणकवली मुख्याधिकाऱ्यांना बंद ठेवण्याचे आदेश नसल्याबाबत कळविले. त्यामुळे कणकवली नगरपंचायत प्रशासनाला पुन्हा शनिवारी, रविवारी बंद नसल्याचे जाहीर करावे लागले.