घेतला अंदाज अन् बंद घरातून चोरट्याने मारला एक लाख 90 हजारांवर डल्ला !

अमित पंडित
Sunday, 13 September 2020

घरातील कुटुंब एक रात्र बाहेर गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डल्ला मारला

साखरपा (रत्नागिरी) : दाभोळे येथे रहाते घर फोडून अज्ञात दरोडेखोरांनी घरातील रोख रक्कम आणि दागिने मिळून एक लाख 90 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. घरातील कुटुंब एक रात्र बाहेर गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हा डल्ला मारला आहे.

ह्याबाबत देवरुख पोलिस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार

दाभोळे बाजारपेठेत राजाराम मारुती मांगलेकर वय 60 हे आपले सरकार सेवा केंद्र चालवतात. गुरुवारी संध्याकाळी मांगलेकर हे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आई आणि पत्नी यांच्यासह लांजा येथे राहणाऱ्या आपल्या मुलाकडे गेले. शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ते परत आले तेव्हा त्यांना घराचा कडी कोयंडा चोरट्यांनी कोणत्यातरी हत्याराने तोडलेला आढळला. घरात गेल्यावर चोरी झाली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील एक लाख 20 हजारांची रोख रक्कम आणि 70 हजारांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. यात सोन्याचा एक हार आणि दोन झूमके यांचा समावेश आहे.

हेही वाचा- बिबट्याची हुल ; सहा दिवस गस्त मात्र पुन्हा एकदा केली त्याने मात

ह्या प्रकरणात देवरुख पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात भा द वी कलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक निशा जाधव आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार पाचपुते करत आहेत 

संपादन- अर्चना बनगे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime case in dapoli sakharpa One lakh 90 thousand was stolen thieves struck