क्रूर आई; महिला दिनीच घेतला मुलीचा जीव, जवानाच्या कुटुंबियावर शोककळा

crime case in ratnagiri 1 year child dead in this crime
crime case in ratnagiri 1 year child dead in this crime

चिपळूण (रत्नागिरी) : दुसरी मुलगी झाली, म्हणून एक महिना चार दिवसांचे आयुष्य असलेल्या चिमुकलीचा स्वतःच्या आईनेच जीव घेतल्याची घटना वहाळ येथे उघडकीस आली आहे. भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानाच्या पत्नीनेच हे कृत्य केले. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिला सावर्डे पोलिसांनी अटक केली आहे. भारतीय सैन्यदलात सेवेत असलेले प्रवीण बळीराम खापले यांना एक महिन्यापूर्वी कन्यारत्नेचा लाभ झाला. त्यासाठी ते काही दिवस गावी वहाळ येथे सुट्टीवरही आले होते. शुक्रवारी त्यांची सुट्टी संपली होती; मात्र त्यांनी आणखी पाच दिवस सुट्टी वाढवून घेतली होती.

प्रवीण खापले हे सकाळी ९ वा. सावर्डे येथे कामानिमित्त निघून गेले होते. त्यांची पत्नी शिल्पा व प्रवीण यांची आई घरी होत्या. शेजारच्या दोन मुली धार्मिक कार्यक्रमाचे निमंत्रण सांगण्यासाठी त्यांच्या घरी आल्या. त्या वेळी मुलींनी चिमुकल्या शौर्याची चौकशी केली. या वेळी बेडरूममध्ये असलेल्या शौर्याला शिल्पा आतमध्ये आणण्यासाठी गेल्या असताना ती तेथे आढळून आली नाही. त्यामुळे त्यांनी घरी शोधाशोध सुरू केली. शोधाशोध करतानाच बाथरूममधील बादलीत लहान बाळाचे पाय दिसले. जवळ जाऊन पाहिले असता बादलीत बुडालेल्या स्थितीत शौर्या दिसून आली. तिला तातडीने वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्यानंतर डेरवण रुग्णालयात नेले; मात्र तेथे तिला मृत घोषित केले. या घटनेची सावर्डे पोलिस स्थानकात माहिती देण्यात आली. सदरच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांनी घटनास्थळी भेट दिली. 

ती रांगू शकत नव्हती

शौर्या एक महिन्याची असल्याने ती रांगू शकत नव्हती. तिच्या शरीरावर कुठे इजाही झालेल्या दिसत नव्हत्या. तिच्या मृत्यूची घटना संशयास्पद होती. पोलिसांनी विविध अंगांनी तपास सुरू केला होता. दरम्यान, आईची चौकशी केल्यानंतर आपल्याला दुसरी मुलगी झाली म्हणून आपणच तिचा खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आईवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com