रत्नदुर्ग किल्ला परिसरात तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

crime case in ratnagiri one women dead accident in see area
crime case in ratnagiri one women dead accident in see area
Updated on: 

रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी खडकामध्ये एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. ही आत्महत्या आहे की, घातपात याचा तपास पोलिस करीत आहेत, मात्र अजून मृतदेहाची ओळख पटलेली नाही. शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.

काल सकाळपासून रत्नदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी होती. सायंकाळच्या सुमारास यातील काही पर्यटक विस्तीर्ण समुद्र आणि सूर्यास्ताचा आस्वाद घेण्यासाठी टेकडीवर गेले. त्यावेळी त्यांना समुद्रकिनाऱ्यावर खडकात मृतदेह असल्याचे दिसून आले. हा मृतदेह दिसताच त्यांनी त्याबाबतची माहिती परिसरातील ग्रामस्थांना दिली. त्यांनी तत्काळ पोलिसांना खबर दिली. काही क्षणातच पोलिस स्थानिकांच्या मदतीने मृतदेहापर्यंत पोहोचले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृतदेहाविषयी...
 

  •  मृत्यू झालेल्या तरुणीचे अंदाजे वय २० ते २२ वर्षे
  •  तिची अद्याप ओळख पटलेली नाही
  •  तिच्या कानात हेड फोन आहेत
  •  तिच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापती दिसून आल्या
  •  गंभीर दुखापतीमुळे रक्तस्राव होऊन मृत्यू झाल्याचा अंदाज 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rajapur Kodavali new dam seven times water storage
Mukhyamantri Vayoshri Yojana
Sindhudurg Ganesh Visarjan
Vengurla Gold Jewellery Theft
Marathi News Esakal
www.esakal.com