
अखेर युवतींनी आरडाओरड केल्यावर दोघेही तेथून पळून गेले, असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.
बांदा (सिंधुदुर्ग) : रानात शेळ्या चरावयास घेऊन जात असताना वाटेत अडवून दोन बहिणींची छेडछाड केल्याप्रकरणी इन्सुलीतील दोन तरुणांवर येथील पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सचिन दीपक नाईक (वय २०) व अनिल विष्णू राऊळ (३७, दोघे रा. इन्सुली- गावठणवाडी), अशी संशयितांची नावे असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी, की इन्सुलीतील दोन युवती शेळ्या घेऊन रानात नदीकाठाने जात होत्या. त्या वेळी सचिन नाईक व अनिल राऊळ यांनी समोर येत शेळ्यांना अडविले व नंतर युवतींची छेडछाड करू लागले. अखेर युवतींनी आरडाओरड केल्यावर दोघेही तेथून पळून गेले, असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. तक्रारीवरून दोघांनाही येथील पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. येथील पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा - गेल्या काही दिवसांमध्ये आठ पक्षी मृतावस्थेमध्ये सापडले आहेत
संपादन - स्नेहल कदम