esakal | आंबोलीतील दरीत तरुणीची उडी
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोलीतील दरीत तरुणीची उडी

आंबोलीतील दरीत तरुणीची उडी

sakal_logo
By
अनिल चव्हाण

आंबोली : येथील मुख्य धबधब्याजवळ (waterfall) सुमारे 30 वर्षाच्या तरुणीने दरी उडी घेतल्याने खळबळ उडाली. ही घटना सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान घडली. पोलिसांनी (amboli police) तातडीने शोधमोहीम सुरू केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, ही तरुणी आंबोली स्टॅण्डवरून घाटाच्या दिशेने रिक्षातून निघाली. रिक्षावाल्याला तिने आपण अहमदनगर (ahmednagar) येथील असल्याचे सांगितले. तिने पंजाबी ड्रेस घातला होता. मुख्य धबधब्याजवळ दरड कोसळलेल्या भागाच्या ठिकाणी तिने रिक्षा थांबवली व उतरली. (crimecase) काही वेळाने तेथेच चप्पल काढत घाट रस्त्याच्या कठड्यावरून दरीत उडी घेतली. तेथील काही लोकांनी हा प्रकार पोलिसांना कळवला. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आज पाऊस आणि धुक्यामुळे शोध घेणे आव्हानात्मक बनले आहे. बचाव पथकाला पाचारण करून उशिरापर्यंत शोध सुरू होता.

हेही वाचा: कोकणातील गावं; पावसाळी पर्यटनास मंडणगड सज्ज

loading image
go to top