esakal | गावठी दारूनिर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त ; सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

बोलून बातमी शोधा

crime cases in ratnagiri illegal alcohol center damaged by police}

जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकून गावठी हातभट्टी दारूसाठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

गावठी दारूनिर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त ; सुमारे ५ लाखांचा मुद्देमाल जप्त
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कौंढर काळसुर (ता. गुहागर) येथे मोठे गावठी दारूनिर्मिती केंद्र उद्‌ध्वस्त करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई करून सुमारे ५ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळी कोणीही आढळून न आल्याने अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची अवैध दारूविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकून गावठी हातभट्टी दारूसाठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

हेही वाचा - ‘रिजनल प्लॅन’ नसल्याचा रत्नागिरी जिल्ह्याला फटका ; ग्रामपंचायतींनाही अधिकार नाही -

दरम्यान, कौंढर काळसुर (ता. गुहागर) येथे हातभट्टीचे गावठी दारू निर्मिती अड्डा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण, खेड, लांजा, रत्नागिरी या भरारी पथकांनी संयुक्त धाड टाकली. यामध्ये गावठी दारू व रसायन असा मिळून ५ लाख ६७ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या ठिकाणी दारूनिर्मितीसाठी लागणारे जवळपास २३ हजार लिटर रसायन आढळून आले. ते पथकाने नष्ट केले. जिल्ह्यातील आजची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

संपादन - स्नेहल कदम