Crime: कोकणात दारूसह ६९ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त; मुंबईकडे केली जात होती वाहतूक

Crime News
Crime Newssakal
Published on: 

Crime: मुंबई-गोवा महामार्गावरील वारगाव येथे स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने चोरट्या दारू वाहतुकीवर कारवाई केली. यात सुमारे ५८ लाखाच्या दारूसह ६९ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मध्यरात्री दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दारू वाहतूक करणारा ट्रक गोवा ते मुंबई असा जात होता.

स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस कॉन्स्टेबल यशवंत आरमारकर हे महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना महामार्गावरील वारगाव येथील राजधानी धाब्‍याजवळ गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक (केअे २५ सी ८३४३१) उभा असलेला आढळून आला. या ट्रकमधून गोवा बनावटीची दारू वाहतूक होत असल्‍याचा संशय आल्‍याने आरमारकर यांनी याबाबतची माहिती वरिष्‍ठांना दिली. त्‍यानंतर पोलीस उपनिरीक्षक शेळके, जामसंडेकर आणि जामदार रात्री दीडच्या सुमारास वारगाव येथे दाखल झाले.

Crime News
Nandurbar Crime News : कुख्यात गुन्हेगार वर्षभरासाठी नंदुरबार जिल्ह्यातून हद्दपार

या दरम्‍यान उभ्या असलेल्‍या ट्रकजवळ चालक अथवा क्लिनर तेथे आढळून आले नाहीत. त्‍यामुळे अन्य खासगी चालकाच्या माध्यमातून हा ट्रक कणकवली पोलीस ठाण्यात आणण्यात आला. या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये रॉयल ब्‍ल्‍यू व्हीस्कीचे १२०० बॉक्‍स आढळून आले. या सर्व दारू साठ्याची किंमत ५७ लाख ६० हजार रूपये आहे. विना परवाना गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्‍या प्रकरणी पोलीसांनी १२ लाख रूपये किंमतीचा ट्रक (केअे २५ सी ८४३१) आणि गोवा बनावटीची दारू जप्त केली.


या कारवाईत महेंद्र घाग, आर. बी. शेळके, गुरु कोयंडे, राजू जामसंडेकर, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, आशिष जामदार, बसत्याव डिसोजा, बाळू पालकर आदींनी सहभाग घेतला होता.

Crime News
Dhule Crime News : 5 लाखांचा गंडा; दोघांविरुद्ध गुन्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com