

रत्नागिरी : फेसबुकवरून प्रेमसंबंध जुळल्यावर लग्नाचे आमिष दाखवून अतिप्रसंग करून नंतर लग्नास नकार देणाऱ्या संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
करण महेश शेणवी (वय २६, रा. करंजारी, ता. संगमेश्वर) असे संशयिताचे नाव आहे. हा प्रकार २०१६ ते २०२० या कालावधीत घडला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पीडित महिलेशी संशयिताची २०१५ मध्ये फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. त्यातून त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर संशयिताने संबंधित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून मुंबईत अतिप्रसंग केला. त्यानंतरही दोघे वारंवार एकत्र आले. या कालावधीत पीडितेच्या घरच्यांनी तिचा विवाह केला. हे समजल्यावर संशयिताने महिलेला जीव देण्याची धमकी दिली आणि आपल्याकडे येण्यास सांगितले व लग्न करण्याची मागणी केली.
पीडिता त्याच्याकडे आली, मात्र त्याने पुन्हा लग्नास नकार दिला. त्यानंतरही संशयिताने गेले वर्षभर तिच्यावर अतिप्रसंग केले. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम ३७६ प्रमाणे संशयितावर गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक एस. एस. बंगडे तपास करीत आहेत. तपासात पोलिसांनी संशयितास ११ फेब्रुवारीला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.