'त्यांना जनतेने निवडून दिले आहे ; शिवसैनिकांना बदनाम करण्याचा प्रयत्न नको'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 November 2020

त्यामुळेच त्यांना जनतेने निवडून दिले आहे. त्यांना उपरे म्हणणाऱ्यांनी याचे भान ठेवावे, असा सल्लाही त्यांना दिला आहे.

राजापूर (रत्नागिरी) : स्थानिक ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतरच या भागाचे पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव यांनी कोदवली ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे खोडसाळ वृत्ते पसरवून शिवसैनिकांना व ग्रामस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न कोणी करू नये, असा इशारा कोदवली ग्रामस्थ व माजी सभापती हरिभाऊ गुरव यांच्यासह ग्रामस्थांनी दिला.

कोदवली ग्रामपंचायतीच्या विरोधात कोणाचीही तक्रार नसताना केवळ सुडापोटी पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव यांनी कोदवली ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी केल्याचा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर कोदवली ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी ही ग्रामस्थांच्या तक्रारीनंतरच झालेली आहे, असा खुलासा ग्रामस्थांनी केला आहे.

हेही वाचा - चक्क बॅंकेचीच केली फसवणूक ; १४ लाखाचे नकली दागिने ठेवले गहाण -

माजी सभापती हरिभाऊ गुरव, माजी सरपंच विवेक मांडवकर, विलास गुरव, सहदेव मांडवकर, रमेश गोडांबे, शाखाप्रमुख सखाराम जड्यार, भरत मांडवे, लिलाधर गुरव, दीपक गुरव, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र सिनकर यांच्यासह सीताराम वाडेकर, गोविंद मुगे, सीताराम मांडवकर, वसंत लाखण, संजय जड्यार आदींच्या मागणीनंतर सुभाष गुरव यांनी कोदवली ग्रामपंचायतीच्या चौकशीची मागणी केली. 

उपरे म्हणणाऱ्यांनी याचे भान ठेवा

चौकशीच्या मागणीनंतर ग्रामपंचायतीची चौकशी होऊन त्याचा अभिप्राय पंचायत समितीला दिला आहे. हा अभिप्राय टीका करणाऱ्या अभिजित गुरव यांनी वाचून पाहावा आणि नंतरच टीका करावी. पंचायत समिती सदस्य सुभाष गुरव हे येथील स्थानिक आहेत. त्यामुळेच त्यांना जनतेने निवडून दिले आहे. त्यांना उपरे म्हणणाऱ्यांनी याचे भान ठेवावे, असा सल्लाही त्यांना दिला आहे.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: criticised on statement of meeters of the shivsainik don't have defamation in ratnagiri