सावधान ! तिलारीच्या कालव्यात वाढतोय मगरींचा मुक्काम

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना अगदी सहजपणे त्या दृष्टीस पडत आहेत.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : तालुक्‍यातील तिलारीचे कालवे आता मगरींच्या मुक्कामाचे ठिकाण बनत आहेत. शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना अगदी सहजपणे त्या दृष्टीस पडत आहेत. साहजिकच शेतकऱ्यांमध्ये भीतीही आहे.

तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी गोवा राज्यासह दोडामार्ग आणि सावंतवाडी या तालुक्‍यांना दिले जाते. त्यासाठी डावा आणि उजवा असे दोन कालवे बांधण्यात आले आहेत. पावसाळ्यात पुराच्या पाण्याबरोबर आणि धरणातील पाण्यातून मगरी अनेक गावात पोचल्या आहेत. तिलारी नदीतही त्यांचे दर्शन अनेकदा घडते. सासोली, मणेरी, कुडासे परिसरात त्यांचा वावर मोठा आढळला आहे.

हेही वाचा - साहेब ते संरक्षक भिंतीच काम कधी होणार ? दोन महिने झालं आम्ही नातेवाईकांकडेच राहतोय -

काही महिन्यांपूर्वी एक मगर कुडासे येथे नदीपात्रात तर अलीकडेच एक मगर कसई दोडामार्ग येथे कालव्यात मृतावस्थेत आढळली होती. जमिनीलगतच्या विहिरीतही त्यांचे अस्तित्व आढळले आहे. त्यातच नुकतेच कुडासे खुर्द येथील पाल प्रकल्पग्रस्त गिरीधर राणे यांना कुडासे आणि भोमवाडी दरम्यान घुडपार नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी एक मगर कालव्यालगत मोकळ्या जागेत उन्हात पहुडलेली दिसली. त्यांनी त्याचे छायाचित्र टिपून ते व्हायरल केले. गेल्या काही काळातील मगरींच्या नदीतील वास्तव्याबरोबरच कालव्यातील वास्तव्य त्यामुळे पुन्हा एकदा ठळक झाले.

हेही वाचा - प्रविण दरेकर पोचले शेतकऱ्यांच्या बांधावर -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the crocodile look in tilari area to farmers in konkan sindhudurg it's dangerous to people

Tags
टॉपिकस
Topic Tags: