esakal | एक शहर जिथं मगरी निवांत राहतात; कोणालाही होत नाही त्रास
sakal

बोलून बातमी शोधा

crocodile in veershaiv lake for many years in ratnagiri chiplun

लोकवस्तीमध्ये दिसणाऱ्या मगरींना वनविभाग पकडून नैसर्गिक अधिवासात सोडतात.

एक शहर जिथं मगरी निवांत राहतात; कोणालाही होत नाही त्रास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : येथील वीरेश्वर तलावात मगरींचे वास्तव्य आहे. दुपारच्यावेळी मगर उन्हात बसण्यासाठी पाण्याबाहेर येते व परत तलावातील पाण्यात जाते. या मगरीपासून कोणालाही धोका नाही. त्यामुळे गेली कित्येक वर्षे तिचे वीरेश्वर तलावात वास्तव्य आहे, अशी माहिती या परिसरातील लोकांनी दिली.

चिपळूण शहरात अनेक ठिकाणी मगरींचे वास्तव्य आहे. अगदी लोकवस्तीमध्येसुद्धा मगर आढळते. लोकवस्तीमध्ये दिसणाऱ्या मगरींना वनविभाग पकडून नैसर्गिक अधिवासात सोडतात. येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या मागील बाजूला ऐतिहासिक वीरेश्वर तलाव आहे. चिपळूणमध्ये काही तळ्यांचे नगरपालिका आणि लोकसहभागातून नूतनीकरण करण्यात आले. त्यापैकी वीरेश्वर हे एक तलाव आहे. उन्हाळ्यातही या तलावात पाण्याची पातळी समाधानकारक असते. 

हेही वाचा - पेन्सिलवर साकारले शिवराय; हृषीकेश वावरे याचे मायक्रो आर्ट -

त्यामुळे या पाण्यात मगरींचे कायमस्वरूपी वास्तव्य आहे. दहा वर्षापूर्वी विरेश्वर तलावाची दुरुस्ती करण्यात आली. चोहोबाजूंनी बंदिस्त असलेल्या या तलावात गोड्या पाण्यातील मासे कमळ, कासव आणि रंगबिरंगी फुले पाहायला मिळतात. काही वर्षापूर्वी पावसाच्या पाण्याने ही मगर तळ्यात आली. तिचे या ठिकाणी कायमस्वरूपी वास्तव्य आहे. ती त्यातून बाहेर येत नाही. आलीच तर त्या बेटावरती असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनाही या मगरींचा धोका नाही.

"विरेश्‍वर तलावात अनेक वर्षापासून मगर आहे. त्यापासून आम्हाला काहीही धोका नाही. मगर असल्यामुळे तलावात मासे पकडण्यासाठी किंवा कमळची फुले काढण्यासाठी कोणी उतरत नाही. दुपारी उन्हासाठी मगर आल्यानंतर तिला पाहण्यासाठी परिसरातील लोक जमतात."

- प्रकाश दीक्षित, चिपळूण

दोन फूट लांबीचा सोनेरी मासाही!

दोन फूट लांबीचा सोनेरी मासा हे या तळ्याचे आणखीन एक वैशिष्ट्य आहे. तलावातील कासव आणि इतर नैसर्गिक संपदा पाहण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच हौशी नागरिक येतात. यातील एखाद, दुसऱ्या व्यक्तीलाच सोनेरी माशाचे दर्शन होते. परंतु दुपारच्यावेळी तळ्यातील एका बेटावर ऊन खात असलेली मगर हमखास पाहायला मिळते.

संपादन - स्नेहल कदम 

loading image