450 कोटीचे पिक कर्ज माफ व्हावे

आंबा बागायतदारांनी विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली
450 कोटीचे पिक कर्ज माफ व्हावे

रत्नागिरी : तौक्ते वादळामध्ये (tauktae cyclone) आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. मदतीपोटी विशेष पॅकेजची (special package) गरज असून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे (ratnagiri and sindhudurg district) साडेचारशे कोटी पिक कर्ज माफ व्हावे यासाठी सरकारपुढे विषय मांडावा अशी मागणी आंबा बागायतदारांनी विरोधी पक्षनेत देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांच्याकडे केली. (crop loan of rupees 450 release from konkan farmers demand)

भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दिपक पटवर्धन यांच्या प्रयत्नातून स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेत आंबा बागायतदारांशी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, प्रसन्न पेठे, गौरव पटवर्धन, राजन कदम तर कोकण हापूस आंबा उत्पादक व विक्रेते संघाचे डॉ. विवेक भिडे, आनंद देसाई यांनी बागायतदारांचे प्रश्‍न त्यांच्यापुढे मांडले. तसेच बागायतदारांच्या मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.

450 कोटीचे पिक कर्ज माफ व्हावे
'कोकणला देण्याच्या वेळी सेनेचा हात आखडता'

रत्नागिरी हापूस (ratngiri hapus) आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे तौक्ते चक्रीवादळात मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीसाठी तयार असलेले फळ बागायतदारांनी गमावले आहे. या चक्रीवादळामुळे झाडेच मुळासह उपटून गेल्यामुळे नुकसान झाले. या व्यावसायावर शेतमजूर आणि कामगारांची कुटूंबे अवलंबून आहेत. या संकटाच्या प्रसंगात आंबा उत्पादकांना तातडीने मदत पॅकेज मंजूर करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.

शासनाकडून मदत जाहीर झाल्यानंतर त्यातील पन्नास टक्के रक्कम तत्काळ शेतकर्‍यांना मिळावी. जेणेकरून कठीण काळात बागायतदारांचा दिलासा मिळेल. बाधित शेतकर्‍यांचा आवाज शासनापर्यंत पोचवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी 450 कोटी रुपये पिक कर्ज घेतले आहे. सध्याच्या स्थितीत ते फेडणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने पिक कर्ज माफी करावी अशी मागणीही केली. 2014 साली पिक कर्ज पुनर्गठन केले होते. त्याचा लाभ अनेकांना मिळालेला नाही. त्याचाही पाठपुरावा करावा.

450 कोटीचे पिक कर्ज माफ व्हावे
'कोकणला देण्याच्या वेळी सेनेचा हात आखडता'

विम्यापासून बागायतदार राहणार वंचित

आंबा पिक विमा योजनेचा कालावधी 15 मे पर्यंतच आहे. तौक्ते वादळाचा फटका 16 व 17 मे रोजी बसला आहे. कालावधी संपुष्टात आल्यामुळे आंबा बागायतदारांना झालेल्या नुकसानीचा लाभ मिळणे अशक्य आहे. विमा योजना राबविताना बागायतदारांना विश्‍वासात घेतले जात नाही. पुर्वी योजनेचा कालावधी 25 मे होता. विमा परतावा मिळावा यासाठी शासनाकडे विशष मांडावा अशी मागणी डॉ. भिडे यांनी केली. त्यावर फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत विषय लावून धरु या असे आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com