'कोकणला देण्याच्या वेळी सेनेचा हात आखडता'

कोकणातील चक्रीवादाळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ते बोलत होते
'कोकणला देण्याच्या वेळी सेनेचा हात आखडता'

रत्नागिरी : कोकणाने शिवसेनेला (kokan) भरपूर दिले आहे. निसर्ग चक्रीवादळ (nisarg cyclone) असो वा तौत्के वादळ (tauktae cyclone), यात लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता शिवसेनेची देण्याची वेळ आली आहे. मात्र हात आखडता घेऊन केंद्राकडे (central government) बोट दाखवले जात आहे. राजकारणात जेवढे प्रेम दाखविले जाते, तेवढे आपत्ती काळातही कोकणावर सेनेने प्रेम दाखवावे, अशी कोपरखळी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणविस (devendra fadnavis) यांनी दिली. (devendra fadnavis is on koka tour see damage of tauktae cyclone)

तौत्के वादळाचा मोठा फटका जिल्ह्याच्या किनारपट्टीला बसला. यामध्ये लोकांचे मोठे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणविस रत्नागिरी दौर्‍यावर होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत (press conference) ते बोलत होते. फडणविस म्हणाले, रत्नागिरीचा (ratnagiri) पाहणी दौरा झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. तौत्के वादळामुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे.

'कोकणला देण्याच्या वेळी सेनेचा हात आखडता'
पंतप्रधानांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे उंचावले मनोधैर्य

जवळपास 5 हजार घरांची पडझड झाली आहे. 1 हजार 200 गावामध्ये विद्युत पुरवठा खंडित होता, तो पूर्ववत करण्यात आला आहे. शेतीचे सुमारे 2 हजार 500 हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा, नारळ, काजू या फळपिकांचे मोठे नुकसान आहे. मच्छीमारांच्या 100 बोटींचे नुकसान झाले आहे. 100 शाळांवरील छत उडाली आहेत. 10 ते 12 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांचे नुकसान झाले आहे. पंचनामे अंतिम टप्प्यात आहेत.

कोकणाने आजवर शिवसेनेला भरपूर दिले आहे.आता शिवसेनेने देण्याची वेळ आली तेव्हा हात आखडता घेतला जात आहे. काही आमदार 500 ते 600 कोटी एका मतदारसंघात घेऊन चालले आहेत. त्याचवेळी वादळग्रस्त जिल्ह्यांना 150 आणि 200 कोटी देऊन बोळवण केली जात आहे. हे योग्य नाही. आमची अपेक्षा आहे, सरकारने योग्य मदत केली पाहिजे.

निसर्गची भरपाई म्हणजे पोकळ घोषणाच...

निसर्ग चक्रावादीळाची 150 कोटीची नुकसान भरपाई वाटप केल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. निसर्गचा परिणाम प्रचंड होता. मोठमोठ्या घोषणा झाल्या होत्या. मात्र भरपाई केवळ 150 कोटी आली. त्या वेळच्या घोषणा पोकळ होत्या, असे फडणवीस म्हणाले.

'कोकणला देण्याच्या वेळी सेनेचा हात आखडता'
दोन महिन्याचं बाळ झालं पोरकं, दुधासाठी भूमीची हाक

आपद्ग्रस्तांना तातडीची मदत द्या...

राज्य शासनाने आपद्ग्रस्तांना तातडीची मदत द्यायला सुरू केली पाहिजे. त्याला फार काही लागत नाही. एनडीआरएफचे पैसे असतात, केंद्र ते राज्याला देते. राज्याने ते खर्च करायचे आहेत आणि संपले की ते पुन्हा मागता येतात. महाराष्ट्र सरकार आपद्ग्रस्तांना वेगाने मदत करू शकते. कोणतीही वाट न पाहता प्राथमिक मदत केली पाहिजेत, असे फडणविस यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com