महाड तालुक्यातील महसुलची क्रशर मालकाशी हातमिळवणी?

रविंद्र पेरवे
सोमवार, 13 मे 2019

लोणेरे (रायगड) : महाड तालुक्यातील सापेतर्फे गोवेले व टोळ बुद्रुक गावाच्या हद्दीत स्टोन क्रशरचे दोन कारखाने आहेत. दगड क्रश करण्याच्या नावाखाली जाडी वाळू क्रश करण्याचा धंदा दिवसाढवळ्या सुरु आहे, मात्र याकडे महाड महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. 

लोणेरे (रायगड) : महाड तालुक्यातील सापेतर्फे गोवेले व टोळ बुद्रुक गावाच्या हद्दीत स्टोन क्रशरचे दोन कारखाने आहेत. दगड क्रश करण्याच्या नावाखाली जाडी वाळू क्रश करण्याचा धंदा दिवसाढवळ्या सुरु आहे, मात्र याकडे महाड महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. 
 

सापे तर्फे गोवेले येथे मे स्टार ट्रेडर्स व टोळ बु. येथे मे. सन इंडस्ट्रीज हे दोन स्टोन क्रशरचे कारखाने उभे आहेत. याबाबत महाड तहसील कार्यालयात अधिक माहिती घेतली असता, पंचवीसशे ब्रास साठी 18 एप्रिल रोजी या दोन्ही कारखान्यांच्या परवान्याची मुदत संपली असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे कारखाने गेली सात महिने सुरु असल्याची माहिती ग्रामस्थांनी सांगितली.

स्टोन किंवा दगड क्रश करण्याच्या नावाखाली जाडी रेती बारीक केली जात आहे. गेली कित्येक वर्षांपासून सापे, वीर रेल्वे स्टेशन व टोळ येथे जप्त केलेली रेती साठवण केलेली होती.  महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून हि रेती कारखान्यात नेली जाते.तरीही जप्त केलेली रेती कुठेजाते याचा पत्ता हि महसूल अधिकाऱ्यांना नसतो. शिवाय ज्या ठिकाणी अवैध रेती साठा आढळतो त्यावर बोजा चढवण्याचे कष्ट हि अधिकारी घेत नाही. त्यामुळे अशा कंत्राटदारांचे फावले आहे.

टोळ नदीच्या दोन्ही बाजूला असलेल्या जाडी रेतीचे साठी हे कारखान्यासाठी बेकायदा वापरले गेले आहेत. त्यामुळे हे साठेही आता दिसेनासे झालेत. स्टोन क्रशरची रॉयल्टी भरून परवाना दिला गेला मात्र डबर कुठून आणणार याची चौकशी हि महसूल अधिकाऱ्यांनी केली नाही का, असा प्रश्न हि आता उपस्थित केलं जातो. 

अशी ही बनवाबनवी
 क्रश केलेल्या दगडाची प्रती ब्रास रॉयल्टी हि साधारण चारशे आहे. कंत्राटदाराने दगडाची रॉयल्टी भरून जाडी रेती बारीक करून विकण्याचा धंदा सुरु आहे. बारीक केलेल्या रेतीची रॉयल्टी साधारण सत्ताविसशे असते. त्यामुळे गेली कित्येक महिने सुरु असलेल्या या कारखान्यात करोडो रुपयांचा महसूल बुडाला आहे. मात्र याकडे महसूल चे अक्षरशः दुर्लक्ष झाले आहे. 

कारखाना बंद करणार का ?  
जप्त जाडी वाळू हि कारखान्यासाठी बेकायदा वापरण्यात आली. मात्र त्याचा दंड देखील घेतला गेला नाही आणि सध्यस्थितीत रेती हि जाग्यावर नाही. चोरटी वाळू वापरणाऱ्या या कारखान्यावर बंदीची कारवाई होणार का असा प्रश्न आता विचारला जातो. महसूल चे झालेले नुकसान अधिकाऱ्याकडून वसूल करणार का ? 

चौकशी करू - तहसीलदार 
18 एप्रिलला मुदत संपून देखील कारखाना सुरु असल्याबाबत महाड तहसीलदार चंद्रसेन पवार यांना विचारले असता माहित नसल्याचेच सांगितले. परवानाची मुदत वाढ करून घेतली असल्यास चौकशी करतो तसेच जाडी रेती बाबत विचारले असता माहीत नसल्याचे सांगितले. 

''स्टोन आणि सँड क्रश साठी एकच रॉयल्टी असते. आम्ही परवाना मुदत वाढ घेतली आहे.''
- सादिक जलाल. 

सोबत छायाचित्र - 1. टोळ येथील कारखान्यात जाडी रेती क्रश केली जाते. 

2. रस्त्यालगतची जप्त केलेली जाडी रेती उचलली जाते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crusher owner of Mahad Taluka are united with revenue system?