
Minister Home Affairs Yogesh Kadam : राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावे डान्सबार असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी शुक्रवारी विधान परिषदेत केला. योगेश कदम यांच्यावर पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी वाळू चोरीचा आरोप केला होता. यानंतर आता त्यांनी कदम यांच्याविरोधात कांदिवलीत सावली डान्सबार सुरू असल्याचा आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे.