Sharad Bhuvad Manali to Leh cycling expedition
esakal
दापोली : गाडीच्या काचेतून हिमालयाचे सौंदर्य अनुभवणे वेगळे; पण सायकलच्या हँडलवर घट्ट पकड ठेवून, अंगावर थंड वाऱ्याचे झोत झेलत आणि श्वासांची गती सांभाळत हिमालयाची दुर्गम शिखरं पार करणे, ही एक वेगळीच अनुभूती (Dapoli cyclist Manali Leh Ladakh cycling journey) असते! हाच थरारक आणि आव्हानात्मक अनुभव दापोली सायकलिंग क्लबचे सदस्य शरद भुवड (रा. पंचनदी) यांनी प्रत्यक्ष जगून दाखविला आहे. त्यांनी मनाली ते लेह-लडाख ही सायकल मोहीम यशस्वीपणे पूर्ण करून कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.