Dapoli Accident News: शेवटचा पेपर देऊन घरी परतताना अपघात, २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू; मैत्रिण गंभीर जखमी

Nursing Student Dies in Dapoli Road Accident: दापोली-खेड मार्गावर २२ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा भीषण अपघातात मृत्यू झाला. शेवटचा पेपर देऊन घरी परतताना मोपेड नाल्यात कोसळली, तर तिची मैत्रीण जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
Dapoli Accident News

Dapoli Accident News

esakaol

Updated on

दापोली: दापोली-खेड मार्गावरील वाकवली येथील शिरशिंगे फाट्याजवळ मंगळवारी सकाळी मोपेडस्वार तरुणीचा रस्त्यालगतच्या नाल्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला, तर सोबतची तरुणी किरकोळ जखमी झाली. सेजल पांडुरंग भागवत (वय २२, रा. टेटवली, खुटाचा कोंड, सध्या रा. विद्यापीठ चाळ, दापोली) असे मृत तरुणीचे नाव आहे. वैष्णवी चंद्रकांत आयरे (मूळ रा. असोंड, ता. दापोली; सध्या रा. विद्यापीठ चाळ, दापोली) असे जखमी तरुणीचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com