Harnai Beach News
esakal
दापोली : समुद्राच्या अथांग पाण्यातील दुर्मीळ समुद्री सस्तन प्राण्यांचे अस्तित्व हर्णै किनाऱ्यावर पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हर्णै बंदरातील एम. एम. फिशरीजसमोर आणि हर्णै बायपाससमोरील समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी (ता. १७) इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉर्पॉईज या समुद्री सस्तन प्राण्यांचे दोन मृतदेह आढळून आले. यातील एक प्राणी नर जातीचा, तर दुसरे लहान पिल्लू असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन्ही प्राण्यांचा मृत्यू आठ ते दहा दिवसांपूर्वी झाला असण्याचा संशय असून, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.