Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

दाभोळ परिसरातील खोंडारण-खालचीवाडी येथे शिकारीसाठी रानात गेलेल्या दोघांवर गावठी बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला.
gun firing

Gun Firing

sakal
Updated on: 

दापोली - दाभोळ परिसरातील खोंडारण-खालचीवाडी येथे शिकारीसाठी रानात गेलेल्या दोघांवर गावठी बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. सचिन शांताराम शिगवण (वय ४४) यांच्या पोटात चार ते पाच छरे लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. सुनील पाध्ये (वय ४८) यांच्या गुडघा व मांडीला दोन ते तीन छरे लागल्याने त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com