शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी ; सेनेला 8, राष्ट्रवादीला 9 जागा

सूर्यकांत दळवी; सेनेला आठ, राष्ट्रवादीला ९ जागा
दापोली ः शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा करताना माजी आमदर सूर्यकांत
दापोली ः शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडीची घोषणा करताना माजी आमदर सूर्यकांतEsakal

दाभोळ (रत्नागिरी) : दापोली (Dapoli) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादीची (Shivsena-NCP)आघाडीची घोषणा शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी (MLA Suryakant Dalvi)व राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम (MLA Sanjay Kadam)यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली.

यावेळी आघाडीतर्फे समन्वय साधून उमेदवारांचा प्रचार करण्यात येईल, असे सांगण्यात आले. ही आघाडी वरिष्ठ पातळीवरून जाहीर झाली असल्याने दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सामील होणार आहेत. या निवडणुकीसाठी शिवसेना ८ तर राष्ट्रवादी ९ जागा दापोलीमध्ये लढणार असून मंडणगडमध्ये ११ जागा, ४ जागा शिवसेना व दोन जागा अपक्ष लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

Summary

आघाडी वरिष्ठ पातळीवरून जाहीर झाली असल्याने दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात सामील होणार आहेत.

शिवसेनेच्यावतीने अरिफ मेमन, ममता मोरे, प्रियांका अमृते, शिवानी खानविलकर, सुचिता रेळेकर, रवींद्र क्षिरसागर, अजीम चिपळूणकर तर राष्ट्रवादीच्यावतीने परवीन शेख, खालीद रखांगे, मेहबूब लांजेकर, विलास शिगवण यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. महाआघाडीला कोणाचाही विरोध नसल्याने सर्व उमेदवार विजयी होतील, असा आशावाद या वेळी व्यक्त केला. वरिष्ठ पातळीवर ठरल्याप्रमाणे दापोली आणि मंडणगड येथे दोन्ही पक्षाच्या वतीने एबी फॉर्म वाटप केले असून त्यानुसार दोन्ही पक्षाच्या विचाराने निवडणुकीला सामोरे जाऊ. आगामी काळात अडीच, अडीच वर्ष नगराध्यक्षपद घेतले जाईल, असे सांगण्यात आले.

आमदार कदमांनीही सहभागी व्हावे

व्यक्तीपेक्षा संघटना श्रेष्ठ आहे. त्यामुळे आमदार योगेश कदम( MLA Yogesh Kadam) यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह या प्रवाहात सामील व्हावे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. त्यांना देखील अर्ज मागे घेण्याबाबत विनंती केली जाईल, असे दळवी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com