dapoli police station
dapoli police station

रत्नागिरी | दापोली पोलीस ठाण्याला आग, अग्निशमनचे जवान तत्काळ दाखल

Published on

आज सकाळी 6 वाजता दापोली पोलिस स्टेशनला आग लागली. यासंदर्भातील माहिती त्वरित अग्निशामक दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या आगीत काय नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. (Fire Broke in Dapoli Police Station)

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी, पोलीस स्टेशनमधले महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. आग लागल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनीही मदत केली. त्यानंतर पोलीस स्टेशनमधून काही बंदुका आणि काही दस्तऐवज बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे.

आग आता आटोक्यात आली आहे. मात्र या आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com