Dapoli Temperature : चौथ्यांदा दापोलीचा पारा 8.5 अंशांवर; मच्छीमारीलाही लागला ब्रेक, यावर्षीचे नीचांकी तापमान

यावर्षीच्या थंडीच्या हंगामामध्ये चौथ्यांदा दापोलीचा पारा आज ८.५ अंशांपर्यंत खाली आला आहे.
Dapoli Temperature
Dapoli Temperatureesakal
Summary

गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. पारा घसरल्याने नागरिकांनी स्वेटर पुन्हा बाहेर काढले आहेत.

हर्णै : यावर्षीच्या थंडीच्या हंगामामध्ये चौथ्यांदा दापोलीचा पारा आज ८.५ अंशांपर्यंत खाली आला आहे. जोरदार थंडी पडू लागल्याने ग्रामीण भागात हुडहुडी भरली आहे. या हंगामातील हे तापमान (Dapoli Temperature) सर्वात नीचांकी आहे. दापोली येथील कोकण कृषी विद्यापिठाच्या (Konkan Agricultural University) कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्रावर पुन्हा एकदा किमान तापमान ८.५ अंश सेल्सिअस अशी नोंद ७ मार्चला झाली आहे.

Dapoli Temperature
Chandoli Sanctuary : मानव-वन्य प्राण्यांत संघर्ष वाढला; जंगल सोडून प्राणी का पडताहेत बाहेर?

थंडीचा हंगाम ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत असतो; परंतु यावर्षी सुरुवातीला थंडी नव्हती. दोन महिन्यांनी अचानक वातावरणात बदल झाला. हंगामात तीनवेळा पारा खाली आला. त्यामुळे बागायतदार सुखावला होता. दापोली तालुक्यातून पहिली आंब्याची (Hapus Mango) पेटी मार्केटमध्ये रवाना झाली. गेल्या आठवडाभरात थंडी गायब झाली आणि कडकडीत ऊन पडू लागले. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते.

Dapoli Temperature
Sangli Tourism : दंडोबा-गिरलिंग बनेल शिव-शक्तिपीठ; 'ही' प्राचीन स्थळे होतील जिल्ह्याची ठळक ओळख

मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा थंडी जाणवू लागली आहे. पारा घसरल्याने नागरिकांनी स्वेटर पुन्हा बाहेर काढले आहेत. गेल्या आठवड्यात जम्मू काश्मीरमध्ये प्रचंड बर्फ पडत होते. त्यामुळे आपल्याकडे उत्तरेकडील वाऱ्याचे प्रमाण जास्तच होते. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये बर्फ पडत आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती कोकण कृषी विद्यापिठाच्या कृषी विभागातील गिम्हवणे येथील हवामान केंद्रातून देण्यात आली. थंडीबरोबरच किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहू लागल्याने मच्छीमारीलाही ब्रेक लागला आहे.

Dapoli Temperature
Dapoli Temperature

आज नोंदवलेले या हंगामातील नीचांकी तापमान अनपेक्षित आहे. गेल्या आठवड्यापासून तापमान वाढू लागले होते. उन्हाळ्याच्या हंगामाला सुरुवात होऊ लागली होती; परंतु गेले दोन दिवस अचानक जम्मू काश्मीरमध्ये बर्फ पडल्यामुळे आपल्याकडील तापमानात घट झाली आहे. अजून दोन ते तीन दिवस हे असेच चालू राहील, असा अंदाज आहे.

-विजय मोरे, हवामान केंद्रप्रमुख, गिम्हवणे

Dapoli Temperature
Depression in Children Symptoms : लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतंय नैराश्य; काय आहेत कारणे?

अनपेक्षित थंडीमुळे कैऱ्या गळून पडत आहेत. पहिल्या आलेल्या मोहोराला आलेली फळे तयार होऊन मार्केटमध्ये चांगला दर मिळाला असता. त्यामुळे सगळी झाडाची ताकद नवीन आलेल्या मोहोराला जाते आणि पहिली आलेली कैरी गळू लागते.

-सागर मयेकर, आंबा व्यापारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com