पाली - सुधागड तालुक्यातील हातोंड, गोंदाव आणि माठळ या गावांमध्ये शनिवारी (ता. 26) रात्री पावणे दोन ते रविवारी (ता. 27) पहाटे सव्वा तीन वाजताच्या दरम्यान 5 ते 6 जणांच्या सशस्त्र टोळीने फिल्मी स्टाईलने धुमाकूळ घालत घरांवर दरोडे टाकले होते.
पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने याबाबत तपास करीत सहा आरोपी यांना पुणे व खालापूर येथून ताब्यात घेतले आहे. बुधवारी (ता. 6) पोलिसांनी माहिती दिली.