सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : येथील बाजारपेठेत माणगावातील तरुणाला भरदिवसा लुटल्याचा प्रकार आज घडला. दोघा संशयितांनी हातचलाखी करत त्या तरुणाचे ५० हजार रुपये पळवले. नीलेश बाळकृष्ण पालव (वय २५) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी त्याने दिलेल्या तक्रारीनुसार दोघा भामट्यांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भर दिवसा हा प्रकार घडला आहे.
जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा धुडगूस सुरू आहे. कणकवली, सावंतवाडीत धाडसी चोऱ्या झाल्या. यानंतर पोलिसांनी एका चोरट्याला पकडले; मात्र चोरीसत्र थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. दोनच दिवसांपूर्वी कुडाळमध्ये चोरी झाली होती. आज पुन्हा सावंतवाडीत भरदिवसा चोरीचा प्रकार घडला. माणगाव येथील युवक नीलेश सावंतवाडी येथील स्टेट बॅंकेमध्ये पैसे भरण्यासाठी आला होता. त्याच्या मित्राचा फोन आला म्हणून तो बाजारपेठेत आला. त्याच्यापाठोपाठ आलेल्या दोन युवकांनी त्याला स्टॅंडवर जाण्याचा मार्ग विचारला व ते पुढे निघून
सावंतवाडीत भरदिवसा चोरीचा प्रकार
गेले. याच दरम्यान हातचलाखी करत त्या दोघांनी पैसे पळवल्याचा संशय आहे. नीलेश बॅंकेमध्ये परत जात असताना आपल्या खिशातील पन्नास हजार नसल्याचे लक्षात आले. मार्ग विचारणाऱ्या त्या दोन चोरट्यांनी पैसे लंपास केल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला. याबाबत नीलेश याने सावंतवाडी पोलिस ठाण्यात त्या दोन युवकांविरोधात चोरीची तक्रार दिली आहे. हवालदार संजय कदम तपास करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.