वैभववाडी : रेल्वे ट्रॅकवर कोकिसरेत सापडला मृत बिबट्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

वैभववाडी - कोकिसरे-नारकरवाडीनजीक रेल्वे ट्रॅकमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. रेल्वेच्या धडकेत या बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

वैभववाडी - कोकिसरे-नारकरवाडीनजीक रेल्वे ट्रॅकमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. रेल्वेच्या धडकेत या बिबट्याचा जागीच मृत्यू झाल्याचे वनविभागाने स्पष्ट केले.

कोकिसरे नारकरवाडीनजीक सकाळी स्थानिक ग्रामस्थांना रेल्वे ट्रॅकमध्ये बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी याबाबत वनविभागाला या घटनेची माहिती दिली. त्यामुळे वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक प्रकाश पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली.  रेल्वे ट्रॅकमध्ये बिबट्या मृतावस्थेत निपचित पडला होता. वनपाल देशमुख यांनी वरिष्ठांना माहिती देत पंचनामा करून बाजूलाच मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dead Leopard found on Rail track in Kokisare in Vaibhavwadi Taluka