Ganpatipule Tourism
Ganpatipule Tourismesakal

Ganpatipule Tourism : गणपतीपुळेतील पर्यटकांत निवडणुकींमुळे मोठी घट; दिवसभरात 10 हजार पर्यटकांची नोंद

दरवर्षी सर्वसाधारण मे महिन्याच्या दुसऱ्‍या आठवड्यापासून पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतात.
Summary

गणपतीपुळेमध्ये सर्वाधिक पर्यटक मुंबई-पुण्यासह बेळगाव, कर्नाटक आणि पश्‍चिम महाराष्ट्रातून येतात.

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections) तिसरा टप्प्यातील मतदानामुळे गणपतीपुळेमध्ये (Ganpatipule Tourism) फिरायला येणाऱ्‍या पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या घटली आहे. उन्हाळी सुट्या सुरू झाल्यानंतर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गणपतीपुळेसह विविध ठिकाणी पर्यटकांची पावले वळतात. मात्र, आज रत्नागिरीतील मतदानाच्या दिवशी गणपतीपुळेमध्ये दिवसभरात आठ ते दहा हजार लोकांनी श्रींचे दर्शन घेतल्याची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मुंबई-पुण्यातील पर्यटकांचा राबता होता.

Ganpatipule Tourism
Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर, हातकणंगलेचा टक्का गतवेळेपेक्षा एकने वाढला; तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर राज्यात अव्वल

उन्हाचा कडाका आणि राज्यभर सुरू असलेला लोकसभा निवडणुकीचे वातावरण यामुळे कोकणातील पर्यटनस्थळांवरील पर्यटकांची (Tourists) गर्दी घटलेली आहे. दरवर्षी सर्वसाधारण मे महिन्याच्या दुसऱ्‍या आठवड्यापासून पर्यटक फिरण्यासाठी बाहेर पडतात. त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीमधील तिसऱ्‍या टप्प्यातील मतदान मंगळवारी (ता. ७) झाले. याच दिवशी पश्‍चिम महाराष्ट्रातील जागांवर मतदान प्रक्रिया झाली. मात्र, मुंबईतील मतदान शेवटच्या टप्प्यात आहे.

गणपतीपुळेमध्ये सर्वाधिक पर्यटक मुंबई-पुण्यासह बेळगाव, कर्नाटक आणि पश्‍चिम महाराष्ट्रातून येतात. मतदानाच्या दिवशीही गणपतीपुळेमध्ये दिवसभरात श्रींचे दर्शन घेऊन येणाऱ्‍यांची संख्या दहा हजारावर पोचल्याचे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरवर्षी मे महिन्याच्या सुरवातीला हा आकडा पंधरा ते वीस हजाराच्या दरम्यान असतो. यंदा त्यात घट झाली आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे. बहुसंख्य पर्यटक थंड हवेच्या ठिकाणी फिरायला बाहेर पडत आहेत.

Ganpatipule Tourism
Whale Fish Vomit : तब्बल पाच किलो 70 ग्रॅमची व्हेल माशाची उलटी जप्त; मालवण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा

रात्री प्रवास करून दिवसा विश्रांती घेण्यावर अनेकांचा भर आहे. समुद्रकिनारीही उन्हाचा कडाका असल्याने पर्यटकांचा राबता कमी आहे. तसेच निवडणुकीमुळे पश्‍चिम महाराष्ट्रातून येणारा वर्ग कमी आहे. निवडणूक असलेल्या जिल्ह्यातील लोकांनी फिरायला बाहेर पडणऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात किनारी भागात पर्यंटकांचा राबता वाढेल अशी आशा किनाऱ्‍यावरील पर्यटकांना वाटत आहे.

Ganpatipule Tourism
'4 जूनला धमाका होणार आणि मी तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने विजयी होणार'; नारायण राणेंना विश्वास

उन्हाळी सुट्यांमध्ये येणाऱ्‍या पर्यटकांवर गणपतीपुळेतील व्यावसायिकांची उलाढाल होत असते. पहिल्या आठवड्यात राबता कमी आहे. निवडणुकांचा कालावधी संपला की पर्यटक वाढतील, अशी अपेक्षा आहे.

-किसन जाधव, गणपतीपुळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com